CM-Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

अखेर 'त्या' शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कर्जबाजारी शेतकऱ्याने आपले म्हणणे मांडण्यासाठी चक्क मुख्यमंत्र्यांचा दरवाजा ठोठावल्यानंतर त्याला 8 वर्षाच्या मुलीसह पोलिसांनी ताब्यात घेतले. ही बाब समजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या शेतकऱ्याची स्वत: दखल घेतली. आणि त्याला सोडून देण्याचे पोलिसांना आदेश दिले. 

शेतीची अवस्था आणि कर्जाचा डोंगर यामुळे त्रस्त असलेल्या देशमुख नावाचा शेतकरी मातोश्री बंगल्यावर आला होता. या शेतकऱ्याने आपल्यासोबत 8 वर्षाच्या मुलीलाही वांद्रे येथील मातोश्री बंगल्यावर आणले होते. आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी त्याने मातोश्रीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर त्या शेतकऱ्याने मातोश्रीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. आणि लहान मुलीसह त्यांना ताब्यात घेत पोलिस व्हॅनमध्ये बसवले. यादरम्यान पोलिस आणि शेतकऱ्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे त्यांना पोलिसांनी खेरवाडी पोलिस स्टेशनमध्ये नेले. 

'मातोश्री' बाहेर घडलेल्या या घटनेची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला सोडण्याचे आदेश पोलिसांना दिले. आणि त्यांच्या कामाची विचारपूस करण्यास सांगितले. तत्पूर्वी, मातोश्रीवर अनेक लोक आपले प्रश्न मांडण्यासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे त्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी कधीकधी असे वागावे लागते, असे मत पोलिसांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT