Video : कॅप्टन कोहली म्हणाला, 'टी-20 वर्ल्डकप जिंकायचाय, तर...'

वृत्तसंस्था
रविवार, 5 जानेवारी 2020

टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला सामोरे जाण्यापूर्वी भारतीय संघाला बोटावर मोजण्याइतकेच सराव सामने खेळता येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सतत क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. गेल्या वर्षी 2019 मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात झालेला पराभव सोडता उर्वरित सामन्यांत आणि मालिकांमध्ये भारतीय संघाने विजयी पताका फडकवली आहे. मात्र, आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये किंग कोहलीची 'टीम इंडिया' अपयशी ठरत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

2020 या वर्षातही भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी सज्ज आहे. यंदा होणाऱ्या टी-20 विश्वकरंडकासाठी संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार असल्यामुळे खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष्य दिले जात आहे. त्यामुळे कॅप्टन कोहलीनेही संघ सहकाऱ्यांना कानमंत्र दिला आहे. 

- Breaking : इरफान पठाणची क्रिकेटमधून निवृत्ती

विराटसेना श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळणार आहे. त्याआधी विराटने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, 'सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करून संघाला विजय मिळवून देऊ शकेल, अशा खेळाडूच्या शोधात सध्या आम्ही आहोत. आणि अशा खेळाडूची संघाला गरज आहे. फक्त दोन-तीन चांगले फलंदाज आहेत, म्हणून प्रत्येक सामना तुम्ही जिंकू शकणार नाही. आणि आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धा तर मुळीच नाही. त्यामुळे संघातील तरुण खेळाडूंनी तळात आक्रमक फलंदाजी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यांच्याकडूनही अशाच अपेक्षा आहेत.' 

- पोट सुटलंय तर दंड भरा; क्रिकेट बोर्डाची कारवाई

तो पुढे म्हणाला, 'सध्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीवर जास्त लक्ष्य केंद्रित करण्यात येत आहे. आणि संघाची बांधणीही अशाच प्रकारे करण्यात आली आहे. तुम्ही एक टीम म्हणून प्रत्येक सामना खेळावा, अशाच प्रकारचे वातावरण आम्ही तयार केले आहे.' 

- महाराष्ट्र केसरी 2020 : विमानात बसलो ते पण थेट ग्रीससाठी... फक्त कुस्तीमुळे!

टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला सामोरे जाण्यापूर्वी भारतीय संघाला बोटावर मोजण्याइतकेच सराव सामने खेळता येणार आहेत. खेळाडूंची दुखापत यासारखे अनेक प्रश्न हे चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला टीम इंडिया कशी सामोरे जातेय, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष्य लागून राहिलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Captain Virat Kohli says about Team India and T20 World Cup 2020