devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडे तीन राज्यांची जबाबदारी; कोणत्या राज्यात कधी दौरा?

संतोष कानडे

मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीस तीन दिवस तीन राज्यांमध्ये सभा, यात्रा करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस हे चालू सप्टेंबर महिन्यामध्ये ५ ते ६ दिवस प्रचारासाठी राज्याबाहेर असणार आहेत. १२, १३, १४, १८ सप्टेंबर रोजी त्यांचा दौरा असेल. शिवाय २२ आणि २३ सप्टेंबर रोजीही ते इतर राज्यांच्या प्रचार दौऱ्यावर असतील.

१२ ते १४ सप्टेंबर दरम्यान, राजस्थानमध्ये फडणवीस पदयात्रा आणि जाहीर सभांना संबोधित करतील. १८ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेश दौरा असेल तर २२ किंवा २३ रोजी ते छत्तीसगडच्या दौऱ्यावर जातील. मध्य प्रदेशमध्ये भाजपची जनसंवाद यात्रा सुरु आहे, त्यात फडणवीस सहभाग नोंदवतील.

मागे बिहारच्या प्रभारीपदाची जाबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे होती. तेव्हा त्यांनी सक्षमपणे नेतृत्व सिद्ध केलं होतं. तिथे सत्तास्थापन केली होती. शिवाय गोव्यातही त्यांनी चुणूक दाखवून दिलेली. आता राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये फडणवीसांचा प्रभाव दिसणार का? हे निवडणुकांनंतर स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT