Devendra Fadnavis Viral Video News Devendra Fadnavis Viral Video News
महाराष्ट्र बातम्या

Viral Video : फडणवीसांचा २०१९चा व्हिडिओ अचानक होतोय व्हायरल; काय बोलले होते ते?

जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे

Komal Jadhav (कोमल जाधव)

Devendra Fadnavis Viral Video News मुंबई : राजकारणापासून दूरच राहिले पाहिजे असे लोक म्हणतात. कारण, राजकारणात कोण कधी पलटी मारेल याचा नेम नसतो. आपल्या फायद्यासाठी घट्ट मित्र वैरी होतात तर वैरी हे मित्र होतात. याची प्रचिती महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली. सत्तेसाठी आधी भाजपने (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेतली. नंतर शिवसेनेने (Shiv sena) राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला (Congress) सोबत घेऊन सरकार स्थापन केले. यामुळे कोणी कोणाला धोका दिला हे अद्याप समजू शकले नसताना जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. काय आहे व्हिडिओत जाणून घेऊ या...

दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. आजवर इतकामोठा बंड झाला नाही (?) असे बोलले जात आहे. या बंडामुळे राज्यातील राजकारणाची पाळेमुळेच बदलली. कारण, या बंडामुळे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. भाजपच्या वरदहस्तामुळे व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खेळीमुळे हे शक्य झाल्याची चर्चा सुरू झाली.

मात्र, बंड सुरू झाल्यापासून ते शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन होईपर्यंत भाजप असो वा देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही भाष्य केले नाही. फक्त शिंदे गटाकडून हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे आवाहन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना करण्यात येत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम स्थान दिल्याचेही बोलले गेले. आता व्हायरल व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस त्या पत्रकार परिषदेत काय बोलले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पद आणि जबाबदारीचे समसमान वाटप

व्हायरल व्हिडिओत विधानसभेच्या जागांसोबतच पद आणि जबाबदारीचे समसमान वाटप होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणताना दिसत आहे. मंचावर विद्यमान केंद्रीय गृहमंत्री, तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शहा तसेच उद्धव ठाकरे उपस्थित असल्याचे दिसत आहे. परंतु, भाजप-शिवसेनेच्या युतीने विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून तसेच सत्तेतल्या अर्ध्या वाट्यावरून वाद निर्माण झाला आणि युतीचे गणित बिघडले.

शरद पवार आले आडवे

सरकार स्थापनेचे गणित मांडणे सुरू असतानाच अजित पवार यांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. हे सरकार पहाटे स्थापन झाले होते. याचीही चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु, अजित पवारांचे बंड राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी ८० तासांत मोडले.

...अन् मविआ सरकार कोसळले

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीचा जन्म झाला. यावेळी मुख्यमंत्रिपदाची धुरा उद्धव ठाकरे यांनी तर उपमुख्यमंत्रिपद अजित पवारांनी स्वीकारले. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाजपकडून सातत्याने म्हणण्यात येत होते. ‘मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल...’ असे स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. अशात एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळे जून महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

राज, शिंदेंनी व्हिडिओ पाहिला असेल ना?

तब्बल १५ दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर ३० जून रोजी शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्यात युती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदेंनी व्हायरल व्हिडिओ पाहिला आणि ऐकला असेल ना? अमित शहा यांना मराठी कळत नसल्याने देवेंद्र फडणवीस काय बोलले होते हे कळाले नसेल का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. फडणवीसांच्या २०१९ सालच्या युतीच्या घोषणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT