Pooja Bhatt : राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’; अभिनेत्री पूजा भट्टचे ट्विट चर्चेत, म्हणाली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pooja Bhatt comment on Bharat Jodo Yatra

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’; अभिनेत्री पूजा भट्टचे ट्विट चर्चेत, म्हणाली...

Pooja Bhatt comment on Bharat Jodo Yatra बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्टने (Pooja Bhatt) काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत जोडो यात्रे’बद्दल ट्विट केले आहे. राहुल गांधी आजपासून कन्याकुमारी येथून पक्षाच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात करणार आहेत. यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी तामिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मारकाला भेट दिली.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या या पदयात्रेत ३,५७० किमी अंतर कापले जाणार आहे. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू होऊन काश्मीरमध्ये संपेल. या यात्रेबद्दल पूजा भट्टने ट्विट केले आले. हे ट्विट सोशल मीडियावर खूप वाचले जात आहे.

हेही वाचा: तारा सुतारियाचा किलर लूक पाहून व्हाल आश्चर्यचकित

‘श्रीपेरुंबदूर येथे राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ प्रार्थना सभेद्वारे #भारत जोडो यात्रेची शानदार सुरुवात. वेदना म्हणजे वेदना आणि नुकसान म्हणजे नुकसान, याला कोण कसे समजते. वेदना पुन्हा अनुभवणे आणि आत्मसात करणे हे एक दुर्मीळ वैशिष्ट्य आहे. राहुल गांधींना हे करताना पाहिले’, असे पूजा भट्टने (Pooja Bhatt) ट्विटमध्ये लिहिले आहे.

पूजा भट्ट लवकरच चूप चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे. या चित्रपटात सनी देओल आणि दुल्कर सलमान यांच्याही भूमिका आहेत. एवढेच नाही तर चित्रपटाची कथा सस्पेन्स थ्रिलर आहे. चित्रपटाची कथा एका सिरीयल किलरची आहे. जो चित्रपट समीक्षकांना मारतो.

Web Title: Rahul Gandhi Congress Bharat Jodo Yatra Pooja Bhatt Actress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..