महाराष्ट्र बातम्या

Munde Vs Awhad: मुंडेंच्या 'बरगड्यां'ना आव्हाडांचं 'कोथळ्या'नं प्रत्युत्तर; राष्ट्रवादीतल्या गटांमध्ये जुंपली

कोल्हापुरातील अजितदादा गटाच्या सभेत धनंजय मुंडेंनी आव्हाडांवर शेलक्या शब्दांत टीका केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कोल्हापुरातील अजित पवार गटाच्या सभेत धनंजय मुंडे यांनी आव्हाडांवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. पायताणाची भाषा करणाऱ्यांच्या बरगड्या राहतील का? अशा आशयाचं विधान मुंडेंनी केलं होतं. त्याला आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्यांचा महाराष्ट्रात कोथळा बाहेर काढला जातो, हे कायम लक्षात ठेवा, असं आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. (Dhananjay Munde Vs Jitendra Awhad rusk emerged over Kolhapur rally of Ajit Pawar group aau85)

आव्हाडांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

कालच्या सभेत धनंजय मुंडे यांनी हसन मुश्रीफ यांचं नाव घेत त्यांनी जर जितेंद्र आव्हाड यांना मिठी मारली तर जितेंद्र आव्हाडांच्या बरगड्या तुटतील असं भाष्य केलं. कदाचित त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही की, बनवा बनवी करून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रात कोथळा बाहेर काढला जातो, हे कायम लक्षात ठेवा, असं ट्विट करत आव्हाडांनी मुंडेंना प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळं आता एकेकाळी राष्ट्रवादीत एकत्र नांदणाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळतं आहे. एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे.

शरद पवारांनी कोल्हापुरात घेतलेल्या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांनी हसन मुश्रीफांवर टीका केली होती. कोल्हापुरी चप्पलेचा उल्लेख करत ''गद्दारी केलेल्या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायताणाचा वापर करावा लागेल'' असं ते म्हणाले होते. त्यावर मुश्रीफांनी कापशीच्या चपलेचा उल्लेख करत ती करकर वाजते आणि एकदा बसली की त्यांना कळेल, असं प्रत्युत्तर दिलं होतं.

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

कोल्हापुरातील जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेचा समाचार घेताना धनंजय मुंडे कालच्या सभेत म्हणाले, ''ज्यानं कुणी पायताणाची भाषा केली त्याला प्रेमानं जरी मुश्रीफ साहेबांनी मिठी मारली तरी त्याच्या बरगड्या राहतील का?'' शरद पवारांच्या उपस्थितीत अशी टीका होणं दुर्दैवी असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीला वाचवायला ५ जणांनी नदीत उड्या मारल्या, पाचही जण बुडाले, मुलगी वाचली

देऊळ बंद 2 ने रितेश देशमुखच्या सिनेमाला टाकलं मागं, 10 व्या दिवशी कोट्यवधीची कमाई, मध्यरात्रीचे शो सुद्धा हाऊसफुल्ल

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Latest Marathi News Live Update : प्रमुख मंदिरांच्या अधिकारांमध्ये मोठा बदल; धर्मदाय आयुक्तालयाकडे संपूर्ण सूत्रे

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात २१ दिवसांत ८६० गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई; पांगरमलसारख्या दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती कायम

SCROLL FOR NEXT