Dhananjay Munde : ''ज्याने पायताणाची भाषा केली त्याच्या बरगड्या राहतील का?'' धनंजय मुंडेंचा आव्हाडांना टोला

Dhananjay Munde
Dhananjay Mundeesakal
Updated on

कोल्हापूरः शरद पवार यांची कोल्हापूरमध्ये सभा झाल्यानंतर आता अजित पवार गटाची सभा आज होतेय. जितेंद्र आव्हाडांनी कोल्हापुरी पायताणावरुन हसन मुश्रीफांवर टीका केली होती. त्याला आज धनंजय मुंडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

''गद्दारी केलेल्या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायताणाचा वापर करावा लागेल'' अशा शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाडांनी सभेतच मुश्रीफांना लक्ष्य केलं होतं. त्यावर मुश्रीफांनी कापशीच्या चपलेचा उल्लेख करत ती करकर वाजते आणि एकदा बसली की त्यांना कळेल, असं प्रत्युत्तर दिलं होतं.

आज कोल्हापूर येथे आयोजित सभेत धनंजय मुंडेंनी त्या मुद्द्याला धरुन नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. ते म्हणाले की, आमच्या सगळ्यांवर आरोप झाले. आरोप करणारे कोण हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. परंतु ज्यांच्यासमोर आरोप होत होते ते आमचं दैवत आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जावून मुश्रीफ साहेबांवर आरोप करीत असाल तर करवीरनगरीतली जनता माफ करणार नाही.

Dhananjay Munde
Video : ''राऊतांनी सांगितलं, पेट्रोल घेऊन जा अन् मनोहर जोशींचं पूर्ण घर जाळून टाक'', शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

मुंडे पुढे म्हणाले की, कोल्हापूरच्या पायताणाची चर्चा झाली. ज्यांना कोल्हापूरच्या पायताणाची ओळखच नाही त्यांनी त्याबद्दल भाषा करावी.. हे कोल्हापूर आहे पायताण कसं बनवायचं, ते पायात कसं घालायचं आणि पायातलं काढून योग्य वेळेला चुकल्यावर कुठं वाजवायचं तेही माहितंय.

Dhananjay Munde
गोफण | दख्खनच्या मऱ्हाठ्यांचा विद्रोह अन् दिल्लीकर बेचैन!

''ज्याने कुणी पायताणाची भाषा केली त्याला प्रेमाने जरी मुश्रीफ साहेबांनी मिठी मारली तरी त्याच्या बरगड्या राहतील का? परंतु संस्कारहीन बोलणं सुरुय.'' असं म्हणत शरद पवार यांच्या उपस्थितीत अशी टीका होणं दुर्दैवी असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hasan Mushrif Maharashtra road condition statement
Hasan Mushrif on Sunetra Pawar
CM Devendra Fadnavis Kagal visit
Hasan Mushrif Gokul Milk Union election announcement
Marathi News Esakal
www.esakal.com