महाराष्ट्र

Loksabha 2019 :  धनगर समाज भाजपच्या पाठीशी राहील - चंद्रकांत पाटील

सकाळवृत्तसेवा

बारामती -  ‘‘राज्यातील धनगर व धनगड एक आहेत, हे म्हणण्याचा अधिकार महाराष्ट्राला नाही. मात्र, महाराष्ट्रात धनगड नाहीत, याचे प्रतिज्ञापत्र आम्ही उच्च न्यायालयात दिले. शिवाय, आदिवासींना मिळणाऱ्या सर्व सवलती आम्ही दिल्या. त्यामुळे धनगर समाज खूष आहे व तो भाजपच्याच पाठीशी राहील,’’ असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.

बारामतीतील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्‌घाटना-निमित्ताने आज बारामतीत आलेल्या पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘टाटा इन्स्टिट्यूट (टीस) ही संस्था मानांकित आहे. त्या संस्थेच्या अहवालाला प्रतिष्ठा असते. त्यामुळे धनगर आरक्षणासंदर्भात या संस्थेला सर्वेक्षणाचे काम दिले होते. त्या संस्थेने अहवाल दिला आहे, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण हवे आहे. त्याची लढाई सुरू आहे. तोपर्यंत आदिवासींना ज्या सवलती आज मिळतात, त्या सर्व धनगर समाजाला देणार, अशी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. आदिवासींसाठी असणाऱ्या आश्रमशाळा, वसतिगृहे, असे ज्या योजना आदिवासींसाठी असतील, त्या सर्व धनगर समाजासाठी राबविल्या जाणार आहेत. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजासाठी या सवलती दिल्या जाणार आहे. त्यामुळे धनगर समाज प्रामाणिकपणे भाजपच्या पाठीशी उभा राहील.’’

आम्ही बारामती विजयासाठी लढवतोय..
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘बारामती लोकसभेत मागील पंचवार्षिक निवडणुकीत ७६ हजार मतांनी पराभव झाला. त्या वेळी भाजपचे केंद्र किंवा राज्यात सरकार नव्हते. शिवाय महादेव जानकर यांना आग्रह करूनही त्यांनी भाजपचे चिन्ह घेतलेले नव्हते. या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी कमाल केलेली आहे, त्यामुळे लोकांचा विश्वास खूप वाढलेला आहे. आता उमेदवार चिन्हावर आहे. त्यामुळे हा फरक तर भरून निघेल आणि आमचाच विजय होईल.’’

मी सन २००८ मध्ये निवडणूक लढवली, तेव्हा एक लाख किलोमीटरचा प्रवास केला. पदवीधरच्या मतदारसंघात दहा लोकसभा मतदारसंघ व सहा लाख मतदार येतात. मी फिरलो आहे. मी पवारसाहेबांसारखे फक्त राज्यसभेत जाऊन बसत नाही आणि माढ्यासारखे मागे फिरत नाही.
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT