ED Attaches Uddhav Thackeray Relative Property uddhav thackeray
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ED ची कारवाई, ६ कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नातेवाईकावर कारवाई केली आहे. ईडीने ठाकरेंच्या मेहुण्याची ६ कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीने ठाण्यात आज सकाळी मोठी कारवाई केली. ठाण्यातील 'नीलांबरी' प्रकल्पातील ११ सदनिका हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या आहेत. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. यापूर्वी मनी लाँडरींगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज याच मालमत्तेवर ईडीने कारवाई केल्याची माहिती आहे.

यापूर्वीही किरीट सोमय्यांनी पाटणकरांवर केले होते आरोप -

कर्जत येथील वैजनाथ देवस्थान येथील जमिनीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी गेल्या जानेवारी महिन्यात केला होता. ''वैजनाथ येथील शंकराचे देवस्थान प्रसिद्ध आहे. अशा या देवस्थानची जमीन गैरव्यवहार करून एका सलीम नावाच्या व्यक्तीच्या नावावर केली. त्यानंतर ती जमीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या नावावर करण्यात आली'', असे गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केले होते.

भाजपकडून ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोप -

आतापर्यंत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर तपास यंत्रणांची कारवाई झाली. ईडी कारवाईमुळे महाविकास आघाडीतील एक मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. तसेच शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊतांच्या निकटवर्तीयांची देखील ईडीने चौकशी केली. त्यामुळे ईडी राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT