कुर्ला परिसरात ED कडून छापेमारी; मलिकांच्या अडचणीत वाढ होणार?

नवाब मलिकांशी संबंधीत मालमत्तांवर ही छापेमारी सुरु असल्याचं समजतंय.
ED
EDTeam eSakal

मुंबईतील कुर्ला परिसरात ईडीची छापेमारी सुरु झाली आहे. गोवावाला कॉम्प्लेक्स परिसरात ही छापेमारी सुरु आहे. नवाब मलिक यांच्याशी संबंधीत या सर्व मालमत्ता असल्याचं समजतंय. एकूणच या सर्व कारवाईवरुन नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांसह सीआरपीएफ जवान देखील कुर्ल्यात दाखल झाले आहेत.

ED
राणेंना हायकोर्टाचा दिलासा; पालिकेच्या नोटिशीवरील कारवाई तुर्तात टळली

मुंबईतील एलबीएस रोडवरील गोगावाला कॉम्प्लेक्स येथे आज सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं होतं. तर दुसरीकडे मुंबईच्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या संपत्तीवर देखील छापेमारी सुरु आहे. एवढंच नाही तर आयकर विभागाकडून मुंबई, बंगळुरु आणि चेन्नई मधील 24 ठिकाणांवर शोध मोहीम राबवण्यात येत आहे. एका प्रसिद्ध विकासकासंदर्भात ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com