Sadanand Kadam
Sadanand Kadam Sakal
महाराष्ट्र

ED Enquiry : सदानंद कदमांना अटक का केली? ईडीच्या वकिलांनी सांगितलं कारण; म्हणाले, "त्यांना आधी..."

सकाळ डिजिटल टीम

साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना काल ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सदानंद कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या खेडमधल्या सभेसाठी मोठी ताकद लावल्याची चर्चा आहे. या सभेनंतर अवघ्या काही दिवसांमध्ये सदानंद कदम यांनी अटक झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, ईडीचे वकील सुनिल गोन्साल्वीस यांनी सदानंद कदम यांच्या अटकेचं कारण सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना गोन्साल्वीस म्हणाले, "याप्रकरणी ११ मे २०२२ ला ईडीकडून इसीआयआर दाखल करण्यात आला होता. पण योग्य पुरावे मिळेपर्यंत अटक करता येत नव्हती. सदानंद कदम यांना 3 वेळा समन्स पाठवलं होतं - १२ डिसेंबर २०२२ फेब्रुवारी २०२३ आणि 09 मार्च २०२३. पण ते चौकशीसाठी आले नाहीत.

गोन्साल्वीस पुढे म्हणाले, "त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणलं. चौकशीनंतर १० मार्च रात्री ९ वाजता त्यांना अटक केली. अटक करण्यासाठी सबळ पुरावाही ईडीकडे होता. तसंच त्यांनी चौकशीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे ही अटक करण्यात आली. "

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : देशभरात संध्याकाळी पाचपर्यंत ५६.६८ टक्के मतदान; महाराष्ट्रात जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान शिंदे

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT