Eknath shinde and sharad pawar initiative for maharastrian students stuck in manipur violence
Eknath shinde and sharad pawar initiative for maharastrian students stuck in manipur violence  
महाराष्ट्र

Manipur Violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी पवार-शिंदे सरसावले! फोनवरून…

रोहित कणसे

मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. दरम्यान येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुध्वणीवरून संपर्क साधला आणि मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्याची विनंती केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांची फोनवरून चौकशी केली.

तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील फोन करत विद्यार्थ्यांबद्दल माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार 14 मराठी विद्यार्थ्यांना मणिपूर येथील शिवसेना भवनात सुखरूप आणण्यात आले असून त्यांना अन्न आणि गरजेच्या वस्तू देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित 8 विद्यार्थ्यांना लवकरच याठिकाणी आणण्यात येणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिपूरमध्ये आडकलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे विद्यार्थ्यांकडून तेथील परिस्थितीची माहिती घेताना दिसत आहेत.

मणिपूरमध्ये हिंसाचारादरम्यान तेथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वसतीगृहात अडकलेल्या महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्याची विनंती पवार यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खासगी विमान पाठवून या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणलं जाईल असे अश्वासन दिले.

हिंसाचारात आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की अधिकृत मृतांची संख्या 54 आहे, त्यापैकी 16 मृतदेह चर्चंदपूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत, तर 15 मृतदेह इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान संस्थेत ठेवण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT