case registered against Shiv Sena Chandrakant Khaire eknath shinde aurangabad esakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrakant Khaire : 'एकनाथ शिंदे तीन दिवसांपासून करताहेत जादुटोणा, म्हणून तर त्यांच्या तोंडात पांढरा खडा...'

राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी होत असताना सत्ताधारी पक्षातील आणि विरोधी पक्षातील नेते हे एकमेकांवर टीका करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde Chief Minister Chandrakant Khaire : राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी होत असताना सत्ताधारी पक्षातील आणि विरोधी पक्षातील नेते हे एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका ही चर्चेत आली आहे. त्यांनी शिंदे यांच्यावर थेट जादुटोण्याचे आरोप केले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजुनं लागावा यासाठी खैरे यांनी होमहवन केलं आहे. त्यावरुन त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी कडाडून टीका केली आहे. होमहवन करुन काहीही होणार नाही. अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी खैरेंवर टीका केली होती. आम्ही आशावादी आहोत, आम्हाला विजयावर खात्री आहे आणि देवावर विश्वास आहे. त्यामुळे त्याची सेवा करणे हे आम्हाला जास्त महत्वाचे वाटते. आम्ही तर देवाकडेच प्रार्थना करु शकतो. अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली होती. आमचा संकल्प हा विजयाचा आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यासगळ्यात साम टीव्हीशी बोलताना खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यात त्यांनी शिंदे हे जादुटोणा करतात. ते गेल्या तीन दिवसांपासून जादुटोणा करत असून त्यांच्या तोंडात एक पांढरा खडा आहे. असे म्हणून खैरे यांनी वेगळेच प्रश्न उपस्थित केले आहे. खैरे यांच्या या वक्तव्यावर पुन्हा एकदा उलट सुलट प्रतिक्रियांना उधाण आले आहे.

यापूर्वी देखील खैरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर टीका केली होती. त्यात त्यांनी शिंदे यांनी जादूटोणा करुन आमदारांना गुवाहाटीला नेले होते. असे सांगत आताही ते तीन दिवस जादूटोणा करायला गेले होते. एकनाथ शिंदे यांच्या तोंडात पांढरा खडा असतो, ते समोरच्याच वशीकरण करतात. ते छाछू करणारे व्यक्ती आहे, हे मला माहीत आहे. अशा शब्दांत खैरे यांनी शिंदेवर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT