Eknath shinde removed from shivsena leader in the party organisation  sakal
महाराष्ट्र बातम्या

CM एकनाथ शिंदेंना झटका! बंडखोरी भोवली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नते पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवसेनेचे ३९ आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. कालच शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आजच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असे वक्तव्य केले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Eknath shinde removed from shivsena leader in the party organisation)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे पत्र जारी केलं आहे. तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहेत, तुम्ही स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे, त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची नावे घेतली होती, तसेच ते शिवसेनेचेच मुख्यमंत्री असल्याचे देखील सांगत होते. त्यानंत उध्व ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे.

ही पक्षांतर्गत कारवाई असून राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचे नेतेपद काढण्यात येईल असे सांगण्यात येत होते मात्र तेव्हा ते कायम ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता पत्र जारी करत ही कारवाई केली आहे.

दरम्यान शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात आणखी एक याचीका करण्यात आली आहे. बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात यावी यासाठी ही याचिका करण्यात आली आहे. १६ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवर सुनावणी होण्याआगोदर बहुमत चाचणी घेण्यात येऊ नये अशी शिवसेनेकडून मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती मात्र सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळे आता ११ जुलै रोजीच सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडमधील अपयशानंतर १५ वर्षांचा वैभव 'बॅक टू वर्क; दौऱ्यावरून परताच घरी राहण्याऐवजी कुठे गेलाय पाहा Video

विद्यापीठाचा ३० जुलैला पदवीदान समारंभ! पद्मभूषण जे. बी. जोशींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ तर पद्मश्री प्रभूणेंना ‘डी.लिट.’; राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान, वाचा...

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT