मुख्यमंत्रीपद मिळालं मात्र, एकनाथ शिंदेंसमोर आहेत ही 5 आव्हानं

maharashtra cm eknath shinde may face shivena bjp and other challenges maharashtra politics
maharashtra cm eknath shinde may face shivena bjp and other challenges maharashtra politics Sakal

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद मिळाले असले तरी आता त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेऊन चालताना त्यांना अनेक परीक्षांना सामोरे जावे लागेल. किंबहुना भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची जागा त्यांच्याकडे असलेल्या संख्याबळाच्या जोरावर नाही तर त्यांच्या धोरणात्मक खेळीतून दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर कोणती पाच मोठी आव्हाने असतील ते... (maharashtra cm eknath shinde may face shivena bjp and these other challenges maharashtra politics)

स्वतःची खरी शिवसेना असल्याचे सिद्ध करणं

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड करून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर केले. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत तळ ठोकून होते. त्यानंतर प्रदीर्घ राजकीय नाट्यानंतर अखेर भाजपने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. यानंतर मोठा निर्णय घेत शिंदे यांना मुख्यमंत्रीपदही देण्यात आले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना शिंदे यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे नाव घेतले. या वाटचालीने त्यांनी स्वत:ची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे सिद्ध करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. त्यांच्याकडे शिवसेनेचे आमदारही मोठ्या प्रमाणात आहेत. असे असतानाही ते ठाकरे घराण्याच्या वारशाला आव्हान देऊ शकतील का, हे पाहणे बाकी आहे.

शिवसैनिकांना आपलेसे करणे

आज शिंदे यांच्याकडे उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार असले, तरी सर्वसामान्य शिवसैनिकांच्या हृदयात स्थान निर्माण करणे त्यांना सोपे जाणार नाही. याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले, जेव्हा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने झाली.यादरम्यान अनेक ठिकाणी शिवसेना आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली. त्याचवेळी त्याचे पोस्टर्सही फाडण्यात आले. अशा स्थितीत शिंदे आगामी काळात सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये लोकप्रिय चेहरा म्हणून स्वत:ला कसे प्रस्थापित करू शकतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

maharashtra cm eknath shinde may face shivena bjp and other challenges maharashtra politics
सरकार आपलंच, कोणी नाराज होऊ नका; फडणवीसांचे आमदारांना आवाहन

भाजपशी चांगले संबंध

मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवण्यासोबतच शिंदे यांना भाजपसोबतच्या समन्वयाचीही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वास्तविक यावेळी महाराष्ट्रात भाजप किंगमेकरच्या भूमिकेत आहे. अशा स्थितीत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे गणित बिघडवले असले तरी त्यांची पुढची वाटचाल खूपच अवघड असणार आहे. विशेषत: अत्यंत हुशार समजल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या सोबत असणार आहेत. अशा स्थितीत थोडीशी चूक झाली तर त्यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची तर जाईलचं, पण भाजपसोबतचे संबंधही बिघडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री म्हणून स्वतःला सिद्ध करणे

शिंदे यांना महाराष्ट्रातील सर्व समीकरणे पाळावी लागणार आहेत. त्यांना राज्यासाठी एक चांगला मुख्यमंत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात काही बाबतीत आदर्श घालून दिला आहे. अशा स्थितीत शिंदे यांना आणखी किती चांगलं करता येईल हे दाखवावं लागेल. याशिवाय, विरोधकांनी त्यांच्यावर बाहुला मुख्यमंत्री असल्याचा आरोप करू नये, असे आव्हानही त्यांच्यासमोर असेल.

maharashtra cm eknath shinde may face shivena bjp and other challenges maharashtra politics
शिंदेच्या आग्रहानंतर फडणवीस बनले उपमुख्यमंत्री - चंद्रकात पाटील

भविष्यातील निवडणुकींसाठी स्वत:ची तयारी

सरकार आणि प्रशासन हाताळण्यासोबतच भविष्यात अनेक महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत, हेही शिंदे यांना लक्षात ठेवावे लागेल. सर्वप्रथम त्यांच्यासमोर बीएमसी निवडणुकीचे आव्हान असणार आहे. याशिवाय 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. हे सर्व पार करून महाराष्ट्राच्या पुढील विधानसभा निवडणुका येतील त्यामध्ये शिंदेंची प्रतिमा आणि भविष्य देखील पणाला लागणार आहे. येथे शिंदे यांना स्वतःला नव्याने सिद्ध करावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com