Land acquisition esakal
महाराष्ट्र बातम्या

गुंठेवारीच्या परवानगीसाठी ‘या’ संकेतस्थळावर करावा लागणार अर्ज! नकाशावर असणार महापालिका अभियंत्यांची स्वाक्षरी; मोजणीसाठी लागणार ‘ही’ ३ कागदपत्रे

महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिका व भूमिअभिलेख कार्यालयाकडून कार्यवाही केली जाणार आहे. जागेच्या मोजणीसाठी महापालिकेत अभियंत्यांचे पॅनल असणार आहे. त्यांनी स्वाक्षरी केलेला प्राथमिक लेआऊट भूमिअभिलेख कार्यालयाकडे दिल्यावर संबंधित जागेची मोजणी करुन गुंठेवारी निश्चित केली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील हद्दवाढ भागातील गुंठेवारीला आता परवानगी मिळणार आहे. महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिका व भूमिअभिलेख कार्यालयाकडून कार्यवाही केली जाणार आहे. जागेच्या मोजणीसाठी महापालिकेत अभियंत्यांचे पॅनल असणार आहे. त्यांनी स्वाक्षरी केलेला प्राथमिक लेआऊट भूमिअभिलेख कार्यालयाकडे दिल्यावर संबंधित जागेची मोजणी करुन गुंठेवारी निश्चित केली जाणार आहे.

सोलापूर शहरात हजारो लोकांनी नोटरीवर जागा घेतली आणि त्यावर बांधकामे देखील केली, पण गुंठेवारीला परवानगी बंद असल्याने जागा स्वत:च्या नावावर न झालेल्यांची संख्या मोठी आहे. महापालिका प्रशासन व शहरातील लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही गुंठेवारीचा प्रश्न सुटत नव्हता. या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गुंठेवारीला परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, भूमिअभिलेख अशा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तो विषय मार्गी लावला आहे. सध्या महापालिकेकडे गुंठेवारीच्या परवानगीचे सुमारे तीन हजार अर्ज प्रलंबित आहेत. त्यांच्यासाठी विशेष कॅम्प घेण्याचेही नियोजन सुरू आहे.

जागेची मोजणी करुन हद्द-खुणा निश्चित केल्या जातील

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरातील गुंठेवारीस परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून अर्जदाराची आवश्यक कागदपत्रे देणे अपेक्षित आहे. त्यानुसार आमच्या विभागाकडून त्या अर्जदाराच्या जागेची मोजणी करुन हद्द-खुणा निश्चित करुन दिल्या जातील.

- दादासाहेब घोडके, अधीक्षक, भूमिअभिलेख, सोलापूर

विशेष कॅम्प देखील घेण्याचे नियोजन

सोलापूर शहरातील अनेक वर्षांपासूनचा गुंठेवारीचा प्रश्न सुटला असून आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. त्यांचा आदेश निघाला की त्यानुसार कार्यवाही सुरू होईल. त्यासाठी विशेष कॅम्प देखील घेतले जातील.

- सचिन ओम्बासे, आयुक्त, सोलापूर महापालिका

मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे

  • अर्जदाराचे महापालिकेकडील गुंठेवारी प्रमाणपत्र

  • महापालिकेकडील नोंदणीकृत परवाना अभियंत्यांनी प्रमाणित केलेले गुंठेवारी रेखांकीत नकाशा

  • ज्या जागेची मोजणी करायची आहे, त्या जागेच्या अर्जदाराचे नाव असलेला सातबारा उतारा

गुंठेवारीच्या परवानगीसाठी अर्ज करायचा कोठे?

गुंठेवारी मोजणीसाठी नागरिकांनी जमाबंदी आयुक्त व भूमिअभिलेख संचालकांनी विकसीत केलेल्या ई- मोजणी व्हर्जन २.० वरील http://115.124.105.146:8069/web किंवा http://mahamojani.mahabhumi.gov.in.8069 यावर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रम्प यांच्या दाव्यावरून गोंधळ, १ विधेयक मंजूर, न्यायमूर्तींना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव अन्...; संसदेत पहिल्या दिवशी काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : राज्यात सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा आहे का? - वडेट्टीवार

बापरे! इतके सुंदर पाय मी आयुष्यात पाहिले नाहीत... सचिन पिळगाववकरांनी मधुबाला यांच्या पायाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

Mahadev Munde Case: ''महादेव मुंडेंच्या न्यायासाठी जिल्हा बंद करणार'' मनोज जरांगेंचा इशारा, ज्ञानेश्वरी मुंडेंची घेतली भेट

Jagannath Hendge case update: 'न्याय द्या, नाही तर..'हेंगडे कुटुंबीयांनी सरकारला दिला कडक इशारा..

SCROLL FOR NEXT