Crime News  
महाराष्ट्र बातम्या

Crime News : गँगस्टर अबू सालेमचा भाचा मोहम्मद आरिफला मुंबईतून अटक, UP पोलिसांच्या ताब्यात

Sandip Kapde

गँगस्टर अबू सालेमचा भाचा मोहम्मद आरिफ सध्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत. मोहम्मज आरिफला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबईत आले होते. या पथकाने मोहम्मद आरिफला अटक केली आहे. त्याला उत्तर प्रदेशमध्ये नेण्यात आले आहे. आजमगड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

काय आहे प्रकरण?

बनावट कागदपत्रांच्या आधारे एका महिलेची जमीन बळकावल्या आरोप मोहम्मद आरिफ याच्यावर आहे. खंडनी आणि जमीन बळकावल्याचा प्रकरणात तो आरोपी आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपी झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान वांद्रे परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे.

आरिफ मुंबईत लपून बसल्याची माहिती यूपी पोलिसांना मिळाली होती. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, आरिफला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक मुंबईला आले. मुंबई पोलिसांनी आरिफबाबत अधिक माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना दिली. दरम्यान, आरिफ वांद्रे येथील एका हॉटेलजवळील पान दुकानावर उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

आरिफची माहिती मिळताच उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक तात्काळ वांद्रे येथे पोहोचले. तिथे आरिफ रस्त्यात उभा दिसला. आरिफला याचा सुगावा लागला नाही, त्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस साध्या वेशात तेथे गेले. या कारवाईचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरिफ एका दुकानासमोर उभा आहे. तेथे आधीच काही लोक आहेत. त्यामुळे साध्या गणवेशात उत्तर प्रदेश पोलिस तेथे पोहोचले आणि आरिफला पकडून दुसरीकडे नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee Setback : उद्धव ठाकरेंपेक्षाही ममता बॅनर्जींना धक्का!, ८० पैकी ५९ आमदार साथ सोडणार; बंगालचे एकनाथ शिंदे कोण?

Mumbai News: पूरमुक्त मुंबईसाठी महापालिका सज्ज! पंपिंग स्टेशन, पर्जन्यवाहिन्यांवर लक्ष

Team India Coach: भारतीय संघात नव्या कोचची एन्ट्री! कोण आहेत गौतम गंभीरच्या टीममध्ये सामील झालेले नवीन सदस्य?

व्वा, काय व्यवस्था आहे! तरुणपणी परीक्षा दिली, पण सेवानिवृत्तीचे वय ओलांडल्यानंतर आलं नियुक्तीपत्र, लोकसेवा आयोगाचा गोंधळ

हायव्होलटेज ड्रामा! आधी उमेदवारी अर्ज बाद झाला, आता पित्रा-पुत्रावर गुन्हा दाखल; अमरावतीत शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर कारवाई

SCROLL FOR NEXT