Sharad Pawar: निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला खिंडार! बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp

Sharad Pawar: निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला खिंडार! बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल

देशात निवडणुकांचे वारे वाहत असताना राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर मविआमध्ये बैठकांचे सत्र चालू झालं आहे. एकीकडे सर्वच नेते पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहेत. अशातच गोंदियात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीच्या गोंदियातील दोन नगराध्यक्षांनी आणि तब्बल पंधरा नगरसेवकांनी शिवसनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित ठाण्यातील निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला आहे. मगील काही दिवसांपासून मविआला खिळखिळी करण्याचे काम भाजप आणि शिवसेना करत आहे. अशातच हा प्रवेश राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार आहे.

मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अशोक टेकवडे यांनी घड्याळ सोडून कमळ हाती घेतलं. अशोक टेकवडे हे 2004 ते 2009 दरम्यान पुरंदर हवेलीचे आमदार राहिले आहेत. भाजप कडून राष्ट्रवादीचा गड जिंकण्यासाठी मिशन बारामती आखण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर टेकवडेंचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का बसला आहे.

लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेचा फॉर्म्यूला ठरला!

 राज्याच मविआ आणि भाजप-शिवसेनेने लोकसभेसाठी कंबर कसली आहे. यासोबतच आता भाजप-शिवसेना महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरु आहे.

गुरुवारी शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत भाजप २६ आणि शिवसेना २२ असा फॉम्युला ठरला असल्याचे समजते. ही प्राथमिक चर्चा झाली आहे.

यानंतर अजून बैठक होऊन जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित होते.