Farmer Protest : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावर बहिष्कार; स्थानिक शेतकऱ्यांची आंदोलनाची भूमिका | Local farmers along with Dr Vijay Shinde protest to protest injustice done to project affected farmers nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Local farmers along with Dr Vijay Shinde protest to protest  injustice done to  project affected farmers nashik news

Farmer Protest : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावर बहिष्कार; स्थानिक शेतकऱ्यांची आंदोलनाची भूमिका

Nashik News : समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकून सरकारकडून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी जवळच्या दुशिंग वाडी येथे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय शिंदे यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. (Local farmers along with Dr Vijay Shinde protest to protest injustice done to project affected farmers nashik news)

सकाळी अकरा वाजल्यापासून परिसरातील शेतकरी समृद्धी महामार्गावर जमा होत आहेत.

पोलीस यंत्रणेकडून खबरदारीचा उपाय म्हणून दंगा नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या आंदोलन स्थळी तैनात करण्यात आले आहेत. आंदोलन करते व समृद्धी प्रकल्पाचे अधिकारी यांच्यात चर्चा अपेक्षित आहे

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कुटे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत.

पोलीस प्रशासनाकडून आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घडून देण्याची हमी दिली.

रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार कोळी उपअभियंता निंबादास बोरसे यांनी आंदोलन शेतकऱ्यांच्या समस्यांची शासन पातळीवर पाठपुरावा करून सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर वावीचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे हे स्वतः आंदोलन डॉक्टर विजय शिंदे दुशिंग वाडीचे सरपंच कानिफनाथ घोटेकर कहांडळ वाडीचे उपसरपंच दत्तात्रय पवार नितीन आत्रे भास्कर कहांडळ यांना शासकीय पोलीस वाहनातून घेऊन शिर्डी कडे रवाना झाले.

टॅग्स :NashikFarmerProtest