Water
Water 
महाराष्ट्र

नीरेच्या पाण्यासाठी अडले गणेश विसर्जन

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर - नीरा नदीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी गुरुवारपासून (ता. १२) गणरायापुढे उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत नीरा कालव्यातून पाणी मिळत नाही तोपर्यंत गणपतीचे विसर्जन करणार नाही, या निर्णयावर येथील शेतकरी दुसऱ्या दिवशीही ठाम आहेत. गणेश विसर्जन न झाल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस तालुक्‍यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात अद्याप पाऊस पडला नसल्याने शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे भीमा आणि नीरा नदीला पूर आलेला असतानाच दुसरीकडे मात्र याच भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी गणपती बाप्पासमोरच आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागाने अद्याप पाणी सोडण्यासंदर्भात कोणतीच हालचाल न केल्याने येथील शेतकऱ्यांचे बाप्पासमोरचे उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. यामुळे येथील गणेशमूर्तीचे विसर्जन अद्याप 
झालेले नाही.

जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गावातील गणपतींचे विसर्जन करणार नाही.
- सचिन ताटे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT