mantralay
mantralay sakal
महाराष्ट्र

मराठा तरुणांसाठी खुशखबर! आरक्षणानंतर तरूणांना आजपासून ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र; उत्पन्न दाखला, नॉन-क्रिमीलेअर अन्‌ जात प्रमाणपत्राच्या मुदतीचे काय?

तात्या लांडगे

सोलापूर : मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक) प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने ऑनलाइन संकेतस्थळावर ‘एसईबीसी’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. उद्यापासून (सोमवार) अर्जदार तरुणांना एसईबीसीचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे, पण तहसीलदारांकडील उत्पन्न दाखला, नॉन-क्रिमीलेअर व त्यानंतर जात प्रमाणपत्र, यासाठी मोठा कालावधी लागेल. त्यावर आता जिल्हा प्रशासन काय मार्ग काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात सध्या १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता १५ एप्रिलपर्यंत आहे. मराठा समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास तरुणांना (एसईबीसी) या भरतीत आरक्षण आहे. पण, त्यांना अद्याप ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळाले नसून त्याची मुदत देखील ३० ते ४५ दिवस असल्याने भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना त्याची पोच पावती चालणार आहे. ‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर आता मराठा तरुणांना ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, पण त्यांना वेळेत दाखला मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाला सुक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रे बंद असून संपूर्ण मदार आपले सरकार सेवा केंद्रांवर आहे. त्यातही चारशे केंद्रे बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर नोकर भरती व शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले लाभार्थींना तत्काळ मिळावेत, एवढीच सर्वांची अपेक्षा आहे.

एसईबीसी प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड

  • मतदान कार्ड

  • अर्जदाराचा रहिवासी पुरावा

  • अर्जदाराची शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा

  • अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाइकांचा शाळेचा दाखला

  • त्या दोन्ही नातेवाईकांचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड

  • दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी) वंशावळ (अर्जदाराचे वय १८पेक्षा कमी असल्यास पालकांचा एक फोटो)

नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्रासाठी...

  • अर्जदाराचे आधारकार्ड, मतदान कार्ड

  • अर्जदाराचा रहिवासी पुरावा

  • अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला

  • जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र

  • तहसीलचे तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे)

तरूणांना काही दिवसांत दाखले मिळतील असे नियोजन

शासनाच्या ऑनलाइन संकेतस्थळावरून आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळण्यास सुरवात झाली आहे. ते प्रमाणपत्र काढण्यासाठी सुरवातीला तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जरुरी असल्याने जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज करणाऱ्या तरुण-तरुणींना काही दिवसांत दाखले मिळतील, यादृष्टीने नियोजन केले आहे.

- मनीषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT