Govind Pansare Murder Case
Govind Pansare Murder Case 
महाराष्ट्र

Govind Pansare Murder Case: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; तपासयंत्रणेच्या हाती नवे धागे दोरे

सकाळ डिजिटल टीम

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडातील फरार आरोपी सारंग आकोलकर आणि विनय पवार यांच्याबद्दल तपासयंत्रणेच्या हाती नवे धागे दोरे लागले आहेत. या प्रकरणी एटीएसच्या तपासाचा सीलबंद अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला आहे.

हायकोर्टाच्या निर्देशानंतर कुटुंबियांच्या विनंतीवरून तपास एसआयटीकडून एटीएसकडे सुपूर्द केला होता. पानसरे यांच्या हत्येचा तपास यापूर्वी विशेष पथकाकडे होता.

मात्र, हत्येनंतर सहा वर्षांत विशेष धागेदोरे तपासात उघड झाले नाही, असा आरोप पानसरे यांच्या मुलीने अर्जाद्वारे केला होता. तपासासाठी एटीएसचे पथक नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने हा तपास एटीएसकडे वर्ग केला.

पानसरे यांच्यावर त्यांच्या घराजवळच १५ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पाच दिवसांनी उपचारादरम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला. मात्र एसआयटीतर्फे करण्यात आलेल्या या प्रकरणाच्या तपासाबाबत असमाधान व्यक्त करून पानसरे कुटुंबीयांनी तो एटीएसकडे वर्ग करण्याची मागणी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT