महाराष्ट्र

सेनेचा दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : दिवाळीचे पाच दिवस संपल्यानंतर शिवसेनेने खाद्यपदार्थ बनवण्याच्या वस्तूंबरोबरच उटणं आणि दिव्यांची भेट दुष्काळी भागासाठी पाठवली आहे. दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेने हा मदतीचा हात दिला आहे. कुटुंबाला लागणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंची भेट दुष्काळी भागात देण्यात येणार आहे. यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पुढाकार घेतला आहे. मराठवाडा विदर्भ भागातील शेतकरी कुटुंबांची या दुष्काळामुळे दयनीय अवस्था आहे. 

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाच्या झळा शेतकरी कुटुंबांना बसत आहेत. अशा अमरावती, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, अकोला, हिंगोली, जालना, बीड, लातूर, वाशीम, नांदेड, उस्मानाबाद आणि यवतमाळ येथील शेतकरी कुटुंबांना गहू आणि तांदूळ, पाच लिटर गोडेतेल, पाच किलो साखर, तीन किलो डाळ, दोन किलो रवा आणि मैदा, तीन किलो डालडा, उटणं आणि साबण अशा दिवाळी आणि गृहोपयोगी वस्तू आज पाठवण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT