Heart-Attack
Heart-Attack 
महाराष्ट्र

दर ३३ सेकंदांनी एकाला हृदयविकार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - मधुमेहाचे बोट धरून येणाऱ्या हृदयविकाराची लक्षणे दिसत नाही. यामुळे हा गोड आजार असलेल्यांनी हृदयाची विशेष काळजी घ्यावी. देशात दर ३३ सेकंदाला एक जण हृदयविकाराच्या विळख्यात सापडत असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी शुक्रवारी दिली.

निमित्त होते, शनिवारपासून सुरू होणाऱ्या ‘बेस्ट ऑफ कॉर्डिऑलॉजी’ परिषदेचे. हृदयविकार रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, वयस्कांच्या या आजाराने आता तिशीत दस्तक दिली आहे. ३० टक्के रुग्ण हे चाळीशीतील असल्याचे वास्तव डॉ. हरकुट यांनी सांगितले. त्यामुळेच या आजारावर जागृती करीत देशभरातील तज्ज्ञांचे ज्ञान अद्ययावत व्हावे या हेतूने इंडियन कॉर्डिऑलॉजी सोसायटीतर्फे दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

परिषदेत प्रसिद्ध हृदयविकारतज्ज्ञ डॉ. सुरेंद्र देवरा, डॉ. प्रशांत अडवाणी, डॉ. चेतन लांजेवार, डॉ. एच. एम. हिरेमठ, डॉ. नितीन देशपांडे, डॉ. आशीष नाबर, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. पंकज राऊत, डॉ. निधीश मिश्रा, डॉ. जोनाथन क्रिस्टोफर, डॉ. बी. के. शास्त्री, डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्यासह देशभरातील प्रख्याक हृदयरोगतज्ज्ञ विचार व्यक्त करणार असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अनुज सारडा यांनी पत्रकारांना सांगितले. ज्येष्ठ हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. अजिज खान उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT