मुंबई - मित्राबरोबर वारंवार शारीरिक संबंध आल्यानंतरही त्याबाबत फौजदारी फिर्याद तातडीने न नोंदविल्यामुळे याला मुलीची सहमती होती, असे स्पष्ट होते; त्यामुळे आरोपी मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एका प्रकरणात दिला.
पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्कार आणि फसवणुकीच्या फिर्यादीबाबत आरोपी मुलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २० वर्षांच्या युवतीने तिच्या २५ वर्षांच्या मित्राविरोधात तीन वर्षांपूर्वी दिलेल्या तक्रारीवरून बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी याबाबत आरोपपत्रही दाखल केले होते; मात्र दोन वर्षांनंतर आरोपीने संबंधित तक्रारदार मुलीबरोबर लग्न केले. त्यामुळे तिने केलेली फौजदारी फिर्याद रद्द करावी, अशी मागणी करणारा अर्ज मुलाने न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.