hari narke esakal
महाराष्ट्र बातम्या

'हिजाब बंदीचे स्वागत करणारे मंदिर-मशीद वादात उलट बोलतात'

ज्येष्ठ इतिहास संशोधक हरी नरके यांनीही एक ट्विट करत भाष्य केलं

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक उच्च न्यायालयाने (High Court) हिजाबविरोधातील याचिका फेटाळल्या असून शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी (Karnataka High Hijab Judgement) योग्यच असल्याचं मत न्यायालयानं मांडलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपने या निर्णयाचं स्वागत आणि समर्थन केले आहे. तर काही राजकीय पक्षांनी हा धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा निर्णय असल्याचे सांगत निराशाजनक प्रतिक्रिया दिली आहे. यावर ज्येष्ठ इतिहास संशोधक हरी नरके (Hair Narke) यांनीही एक ट्विट करत भाष्य केलं आहे. यात त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) थेट निशाणा साधला आहे.

यात ते म्हणतात, आज जे न्यायालयाच्या धार्मिक विषयावरील निकालाचे स्वागत करत आहेत तेच काही वर्षांपूर्वी मंदिर-मशीद वादात अगदी उलट बोलत होते. तेव्हा हेच अर्ध्या चड्ड्यावाले म्हणत होते, 'हा आमच्या धर्माचा विषय असल्याने त्यावरचा न्यायालयाचा निकाल आम्ही मानणार नाही.' हे ढोंगी लोक सराईतपणे खोटे बोलतात, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) मंगळवारी महत्त्वाचा निकाल दिला. या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याचं सांगत कर्नाटक उच्च न्यायालयानं यासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्या आहेत. यानंतर राजकीय नेत्यांनी यांसदर्भात आपली मतं व्यक्त केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT