dilip walse patil
dilip walse patil esakal
महाराष्ट्र

मोठी बातमी! वाझे-परमबीर सिंग यांच्या भेटीवर चौकशीचे आदेश

ओमकार वाबळे

खंडणी प्रकरणात चौकशी सुरू असलेले परमबीर सिंग अनेक महिन्यांपासून गायब होते. त्यांना कोर्टाने फरार घोषित केलं. यानंतर परमबीर सिंग मुंबईत चंदीवाल आयोगासमोर चौकशीला उपस्थित राहिले. यावेळी वाझेची सुनावणीही पार पडली.

सचिन वाझे मनसुख हिरेन हत्येशी संबंधित असल्याने त्याचीही चंदीवाल आयोगाकडून चौकशी सुरू आहे. सुरुवातील दोघांमध्ये काही सेकंद बोलणं झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र, दोघेही तासभर सोबत असल्याची माहिती समोर आली. यानंतर गृहमंत्री वळसे पाटील यांनी संबंधित प्रकरणावर नाराजी व्यक्त केली.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी वाझे-सिंग यांच्या भेटीवर बोलताना मोठा निर्णय घेतला. कालच्या भेटीबद्दल मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,असे गृहमंत्री म्हणाले. आता या भेटीमुळे काँट्रोव्हर्सी तयार होणार आहे. येणाऱ्या काळात ही भेट गोघांच्या विरोधात जाण्याचीही शक्यता आहे.

परमबीर सिंग यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीवर कोणताही दबाव नाही. असा दबाव असण्याचं काही कारण नाही. परमबीर सिंग त्याच्याविरोधात ज्या ज्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी ते जबाब नोंदवत आहेत, असे वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, परमबीर सिंग यांनी मुंबईतील किल्ला कोर्टात हजेरी लावली. या न्यायालयाने परमबीर सिंग यांच्याविरोधा अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेने कोर्टात परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याची मागणी केली होती.

ज्युडिशीअल कस्टडीत असताना बाहेरील व्यक्तींना भेटण्याची परवानगी नसते. मात्र, वाझे आणि माजी आयुक्तांमध्ये झालेल्या भेटीवर मुंबईच्या पोलीस आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असं वळसे पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराट आऊट, पण फाफ डू प्लेसिसचा चेन्नईला अर्धशतकी दणका

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT