Aaditya Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

IAS अधिकारी मला विचारतात सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागतोय; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट!

रुपेश नामदास

Aaditya Thackeray: ठाणे जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाविकास आघाडीच्या वतीने ठाणे पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हणाले, विशीतील आणि तिशीतील युवकांनी विचार करा तुम्ही जेव्हा तुमचं शिक्षण पुर्ण कराल त्यावेळी तुम्हाला नोकऱ्या मिळतील का?

गेल्या सहा ते सात महिन्यांमध्ये मी प्रत्येक उद्योगपती सोबत बोललो, भेटलो, अधिकाऱ्यांना भेटलो IAS, IPS अशा सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो, IAS, IPS यांना कामा बद्दल विचारलं असता ते सांगतात साहेब जे चाललं आहे ते चाललं आहे. पण तुमचा निकाल कधी लागत आहे. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही येणार लवकर येणार.

मात्र उद्योजक सांगत आहेत. आदित्य आम्ही जे आहेत तेच प्रकल्प पुढे घेवून जात आहे. नवीन प्रकल्प आणत नाही. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच ठाण्याचे पोलिस आयुक्तांना टोला लगावला ते म्हणाले, या सभेनंतर मला पोलिस कमिश्नर पळून जाण्या अगोदर भेटायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ‘या’ महिलांना यापुढे मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ; एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचे लाभ बंद, आता 2.50 लाखाचे उत्पन्न नसलेल्यांची पडताळणी

New Delhi: उच्च न्यायालय! 'पीडित मुलीच्या आरोपांची दखल घ्या'; फक्त वैद्यकीय अहवालावर विसंबून राहू नका

Panchang 21 July 2025: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण करावे

Beed Crime: 'त्या' प्रेमप्रकरणाचा जीवघेणा शेवट; पाच आरोपींपैकी तिघांना अटक, दोन फरार,गेवराईतील घटना

14 वर्षे जुन्या ‘एसएमटी’तून दररोज 2000 शालेय मुलींसह 7000 प्रवाशांचा प्रवास! नोव्हेंबरमध्ये सोलापुरातून धावणार केंद्र सरकारच्या नव्या इलेक्ट्रिक बस

SCROLL FOR NEXT