Rupali Chakankar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Women's Day 2023 : 'विधवा' ऐवजी 'पूर्णांगिनी' म्हणा; महिला आयोगाकडून राज्य सरकारकडे शिफारस

विधवा शब्द हा त्यांचा अपमान केल्यासारखं वाटत आहे, असंही महिला आयोगाने म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

विधवा हा शब्द न वापरता पूर्णांगिनी हा शब्द राज्यात वापरला जावा, अशी शिफारस राज्य महिला आयोगाकडून करण्यात आली आहे. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने ही मागणी करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी राज्य महिला आयोगाकडून सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, "८ मार्च हा एकच दिवस महिला दिन म्हणून साजरा होतो. पण मागच्या ३६४ दिवसांचं काय? महिलांचे अनेक प्रश्न आहेत, महिला विविध क्षेत्रात काम करतायत, पण त्यांचे प्रश्न संपलेले नाहीत. आमची लढाई पुरुषांविरोधात नाही तर आमची लढाई समाजातल्या विकृती विरोधात आहे."

रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या, "कोरोनामध्ये ८५ हजार महिला विधवा झाल्या. त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. महिला दिनी विधवा ऐवजी पूर्णांगिनी हा शब्द राज्यात वापरला जावा यासंदर्भात राज्य महिला आयोगाकडून राज्य सरकारला शिफारस करण्यात आली आहे. विधवा हा शब्द त्यांचा अपमान करण्यासारखा वाटतो. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलयाचा धोका! भोटेकोसी नदी फुगली; ७८८ मृत्यू, तीन हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता

SCROLL FOR NEXT