Maratha Andolan 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan: मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर ती आधी माझ्यावर घाला; छत्रपती संभाजी राजेंचा संताप

कार्तिक पुजारी

Jalna Lathicharge - माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी जालन्यातील मराठा आंदोलनकाची भेट घेतली. यावेळी त्यांनी लाठीचार्जच्या घटनेचा निषेध केला. आंदोलकांवर तुम्ही गोळीबार कसाकाय करु शकता.

मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर ती आधी छत्रपती संभाजीराजेवर घाला अशी उदिग्न प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. जालना जिल्ह्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद राज्यात उमटत आहेत.

मराठा आंदोलकांशी संभाजी राजे यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, कालच्या घटनेवर बोलणं मी क्रमप्राप्त समजतो. शिवाजी महाराजांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा वंशज म्हणून मी येथे बोलत आहे. शाहू महाराजांनी जगाच्या, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आरक्षण लागू केले. शाहू महाराजांनी ५० टक्के आरक्षण बहुजनांना दिलं होतं.

आज गरीब मराठ्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे आंदोलनासाठी मी बाहेर पडलो आहे. मराठ्यांनी कायम शांततेने मोर्चे काढले आहेत. ५८ मोर्चे काढले पण कुठंही हिंसाचार झाला नाही. त्याची दखल जगाने सुद्धा घेतली.

पण, कालच्या घटनेमध्ये लाठीचार्ज झाला, गोळ्या झाडल्या, अश्रू धुरकांड्या फोडल्या. कालचा प्रकार निंदनीय आहे. आम्ही सरकारचा निषेध करतो, असं राजे म्हणाले.

निजामाचे राज्य होतं, मोघलांचं राज्य होतं. त्यानंतर शिवाजी महाराजांचं आणि इंग्रजांचं राज्य आलं. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राज्य करता. हेच सुराज्य आहे का? आंदोलकांवर गोळ्या झाडायच्या का? असं होत असेल तर मी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंशज म्हणून सांगतो. मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर आधी संभाजी छत्रपतींवर गोळी घाला, असं ते म्हणाले.

ज्या मानसांनी हे आदेश दिले त्याचे निलंबन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तसेच यावर सरकारने स्पष्टीकरण द्यायला हवं. तुमचं सरकार दिल्लीत आहे, महाराष्ट्रात आहे. तुम्ही सांगा किती वर्षे लढा द्यायचा. हे पाकिस्तानी, मुघल, दहशतवादी आहेत का? यांच्यावर लाठीचार्ज करता. आम्हाला न्याय कधी देणार, किती समित्या नेमणार? असा सवाल राजेंनी केला.

आरक्षण कसे मिळवून देणार ते सांगा, गोळ्या घालने चुक आहे का बरोबर हे मुख्यमंत्री , दोन उपमुख्यमंत्री यांनी जनतेला सांगावे. उपोषणाला पाठींबा व साथ देण्यासाठी येथे आलो आहे. मुख्यमंत्री, दोन उप मुख्यमंत्री काय बोलतात याची आम्ही वाट पाहत आहे, असे छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये धर्मांतरण आणि महिला शोषण प्रकरणात नवा वळण

SCROLL FOR NEXT