CM Eknath Shinde Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : 'मराठा आरक्षणासाठी रक्त सांडायलाही मागे सरणार नाही'; युवकानं CM शिंदेंना लिहिलं रक्तानं पत्र

बहुसंख्य मराठा समाजाची महाराष्ट्रातील स्थिती आज घडीला बिकट आहे.

सकाळ डिजिटल टीम

सर्व समाजाची भावना लक्षात घेऊन सरकारने मराठा समाजाच्या मागणीचा गांभियाने विचार करावा, असा इशारा चवडे यांनी दिला.

-राहुल मुजमुले

परतूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, यासाठी मागील दहा दिवसांपासून आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. मराठा समाजाच्या मागणी संदर्भात अद्यापपर्यंत समाधानकारक तोडगा निघालेला नाही.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढावा. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करण्यात यावा, अशी मागणी परतूर तालुक्यातील (Partur Jalna) खडकी गावातील युवकाने आपल्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

गजानन चवडे असे या युवकाचे नाव आहे. पूर्णतः शेतीवर अवलंबून असलेल्या बहुसंख्य मराठा महाराष्ट्रातील समाजाची स्थिती आज घडीला बिकट आहे. समाजातील अनेक युवक उच्चशिक्षित असून देखील बेरोजगार आहेत. मराठा आणि कुणबी हे एकच असून मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.

अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. स्वत:च्या समाजासाठी आज मराठा युवक जागा झाला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक युवक आपले रक्त सांडायला मागे सरणार नाहीत. सर्व समाजाची भावना लक्षात घेऊन सरकारने मराठा समाजाच्या मागणीचा गांभियाने विचार करावा, असा इशारा चवडे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

SCROLL FOR NEXT