महाराष्ट्र

आठवडाभरात सात जणांना जीवनदान 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - आठवडाभरात दोन रुग्णांच्या मृत्युपश्‍चात अवयवदानातून सात जणांना जीवनदान मिळाले आहे. मुंबईत पहिल्यांदाच दान झालेले फुप्फुस चेन्नईतील रुग्णाला देण्यात आले. माहीम येथील रहेजा आणि विलेपार्ले येथील नानावटी या रुग्णालयांत 27 आणि 28 फेब्रुवारीला अवयवदान झाले. त्यामुळे या वर्षातील अवयवदानाची संख्या 16 वर गेली आहे. 

रहेजा रुग्णालयात 59 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचे अवयवदान केले. जिन्यावरून घसरून पडल्यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रहेजा रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. डॉक्‍टर आणि अवयव प्रत्यारोपण समुपदेशकांनी त्यांच्या कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यांचे यकृत, एक मूत्रपिंड आणि नेत्रपटलाचे दान करण्यात आले. त्यामुळे दोन रुग्णांना जीवनदान मिळाले. 

ब्रेन स्ट्रोकमुळे नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 40 वर्षांच्या संतोषी घोंगालिया यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पतीने संतोषी यांच्या अवयवदानासाठी परवानगी दिली. या महिलेचे हृदय, यकृत, एक मूत्रपिंड आणि फुप्फुसाचेही दान झाले. त्यामुळे पाच रुग्णांना जीवनदान मिळाले गेले. त्यांचे फुप्फुस चेन्नईतील रुग्णाला देण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update:"राम कृष्ण हरी," म्हणत पंतप्रधानांचे सोलापुरातील भाषण सुरू

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT