Sharad Pawar
Sharad Pawar 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : विखे पाटलांचा ‘बालहट्ट’ कसा पुरवू? - शरद पवार

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - ‘एखाद्याच्या घरातला बालहट्ट मी कसा पुरवणार? बालहट्ट पुरवण्यासाठी पक्ष नसतो,’’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना आज लगावला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. 

सुजय विखे यांनी कोणत्या पक्षात जावे? राधाकृष्ण विखे यांनी काय करावे? हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्‍न असल्याचे पवार म्हणाले. 

दरम्यान, राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टी यांच्यासाठी एक जागा सोडली असून, काँग्रेसच्या संबंधातील चर्चा झाल्यानंतरच घोषणा होईल, असे सांगून पवार म्हणाले, ‘‘प्रकाश आंबेडकर व मनसे यांच्याशी आघाडीबाबत माझी कोणतीही चर्चा झालेली नाही.’’

माढा लोकसभेतून माघार घेतल्याबाबत बोलताना पवार म्हणाले, ‘‘निवडणूक लढवत नाही याचा आनंद आहे. मी १४ निवडणुका लढलो कधीही पराभव झाला नाही. मात्र माझ्याविरोधात वक्तव्य करणारे त्यांची पातळी दाखवून देतात,’’ या शब्दांत पवार यांनी फटकारले. 

घराण्यात वाद नाहीत
‘‘माढा मतदारसंघाविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मी स्वतः मोहिते पाटलांना आग्रह केला की तुम्ही निवडणूक लढवा,’’ असे सांगितल्याचे पवार म्हणाले. ‘‘पवार घराण्यात कोणतेही वाद नाहीत, वाद निर्माण करणारे कधीही यशस्वी होणार नाहीत,’’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT