solapur
solapur sakal
महाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे २१ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान! एक लाख हेक्टरवरील पिकांना फटका; निवडणूक कामांमुळे पंचनाम्यास विलंब

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूरसह राज्यातील २१ जिल्ह्यांमधील ९७ हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. केळी, आंबा, द्राक्ष, डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरु आहेत, पण अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या प्रशिक्षणात व निवडणूक ड्युटीमुळे पंचनामे सुरु झालेले नाहीत, अशी स्थिती आहे.

पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके वाया गेली, अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना सर्व पिकांचा पीकविमा मिळालेला नाही. त्यानंतर राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आणि त्या बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत देखील मंजूर केली. मात्र, अनेक शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देखील मिळालेली नाही. आता एप्रिलमधील अवकाळीचा फटका राज्यातील २१ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना बसला असून त्यात जवळपास ९७ हजार हेक्टरवरील विशेषत: फळबागांना फटका बसला आहे. वाऱ्यामुळे आंबे गळून पडले आहेत. आता ज्या भागात ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे, त्यांना नियमाप्रमाणे भरपाई मिळेल. पण, त्यासाठी पंचनाम्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला सादर होणे आवश्यक आहे. पंचनाम्यांची गती पाहता मदतीसाठी आणखी काही दिवस बाधित शेतकऱ्यांना वाट पाहावी लागेल हे निश्चित.

निवडणूक कामामुळे पंचनाम्यास विलंब, तरीपण दोन दिवसात पंचनामे पूर्ण होतील

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील केळी, आंबा, द्राक्ष अशा बागांसह भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. निवडणूक कामामुळे पंचनाम्यास अडचणी येत आहेत, तरीपण मार्ग काढून पंचनामे सुरु आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंचनामे एक-दोन दिवसात पूर्ण होतील, असे नियोजन आहे.

- दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

सर्वाधिक नुकसान झालेले जिल्हे

  • अमरावती : ४४,७६० हेक्टर

  • अकोला : १०,०९० हेक्टर

  • बुलढाणा : ५,१०९ हेक्टर

  • वाशिम : ४,८३० हेक्टर

  • सोलापूर : १,५९७ हेक्टर

सोलापूर जिल्ह्यातील १४०० हेक्टरवरील बागांचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील जवळपास ८९ गावांमधील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका सोसावा लागला आहे. त्यात बागायती क्षेत्रावरील ११० हेक्टर तर चौदाशे हेक्टरवरील फळबागा भुईसपाट झाल्याची स्थिती आहे. केळी, आंबे, द्राक्ष पिकांना सर्वाधिक फटका बसला असून त्याचे पंचनामे सुरु आहेत. करमाळा तालुक्यात ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंढरपूर, मंगळवेढा, माढा, माळशिरस व मोहोळ या पाच तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडील अहवालातून दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Result 2024: बारावीच्या निकालात मुलींचा डंका, कोकणातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण, जाणून घ्या संपूर्ण निकाल

MS Dhoni Injury Update : MS धोनीला नक्की झाले तरी काय... उपचारासाठी जाणार लंडनला?

Latest Marathi News Live Update: राज्याचा बारावीचा निकाल जाहीर; ९३.३७ टक्के लागला निकाल

Pune Accident: पुणे अपघात प्रकरणी कारवाईला वेग! बार मालक, मॅनेजरसह पाच जणांना अटक

Gold Loan: आरबीआयच्या कडक नियमांमुळे गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; आता मिळणार कमी पैसे

SCROLL FOR NEXT