महाराष्ट्र

कर्जमाफी नाही तर कामकाज नाही

सकाळन्यूजनेटवर्क

नागपूर - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर विरोधकांनी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी गोंधळ घातला. प्रश्‍नोत्तराच्या तासात विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याने विधानसभेचे कामकाज तीन वेळ तहकूब करण्यात आले. याशिवाय स्थगन प्रस्ताव आणि लक्षवेधी सूचनेच्या मुद्‌द्‌यावरून सरकारला लक्ष्य करीत विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले. विरोधकांनी सातत्याने घोषणाबाजी केल्याने ‘लक्षवेधी’दरम्यान चौथ्यांदा कामकाज तहकूब करण्यात आले. जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला. 

प्रश्‍नोत्तराच्या तासात विरोधक आमदारांनी अध्यक्षासमोर येत, कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी लावून धरत, घोषणाबाजी केली. त्यामुळे दोनदा दहा मिनिटासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. यानंतर पुन्हा प्रश्‍नोत्तराचा तास सुरु होताच, पुन्हा विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. त्यामुळे अर्धा तासासाठी अध्यक्षांनी पुन्हा एकदा कामकाज तहकूब केले. यानंतरही विरोधकांनी गोंधळ घालणे सुरूच ठेवल्याने संपूर्ण प्रश्‍नोत्तराचा तास गोंधळात गेला. 

विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारून विदर्भ, मराठवाडातील हजारो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असताना, माहिती नसल्याचे कारण देत, लक्षवेधी टाळणे शेतकऱ्यांचा अपमान असल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. या वेळी विरोधकांनी गोंधळ घातल्याने दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

‘दूध का दूध पानी का पानी’
प्रश्‍नोत्तराचा तास संपताच विरोधकांनी स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला. दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात ३१ ऑक्‍टोबर २०१७ मध्ये सरकारकडून कर्जमाफी झाली असल्याची माहिती देणारी जाहिरात दाखवीत, त्यात कर्जमाफी झाल्याचे नमूद केले असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात तीन आणि चार महिने उलटूनही कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याचे सांगून कर्जमाफीच्या आकडेवारीतील फोलपणा दाखवून दिला. मुख्यमंत्री आणि सहकारमंत्री वेगवेगळ्या तारखा देतात. केवळ हजार रुपयांच्या टॅम्पवर लिहून देणार असे सांगू नका ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊन जाऊ द्या, असा इशाराही त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT