महाराष्ट्र

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला "क्‍लीन चिट' 

सकाळन्यूजनेटवर्क

नागपूर - मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कर्ज वितरणात गैरव्यवहार नव्हे, तर अनियमितता झाल्याचे स्पष्ट करत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी मुंबई बॅंकेला "क्‍लीन चिट' दिली. बॅंकेच्या दोन शाखांमध्ये अनियमितता झल्याने संबंधित शाखा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. 

मुंबई जिल्हा बॅंकेतील खातेदारांच्या नावावर कर्ज काढून संचालकांच्या नातेवाइकांनी गैरव्यवहार केल्याबद्दल भाजपच्या संजय सावकारे यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सहकारमंत्र्यानी कर्जवाटपाचे अधिकार शाखा अधिकाऱ्यांना असल्याने कर्जवाटपाचा आणि संचालकांचा संबंध नसल्याचे सांगितले. 

बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्जवाटप करण्याचे अधिकार आहेत. कर्जदारांकडून व्यवस्थित अर्ज भरून न घेतल्याने अनियमितता झाली आहे, असे देशमुख म्हणाले. सहकारमंत्र्यानी या वेळी मुंबई बॅंकेच्या कारभाराची प्रशंसा केली. 

चौकशी अहवालानंतर कारवाई 
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने सेवाकर वसुलीत गैरव्यवहार केल्याच्या तक्रारीची द्विसदस्यीय समितीकडून चौकशी सुरू असून, त्याचा अहवाल आल्यानंतर अहवालातील निष्कर्षाच्या आधारे दोषी पणन संचालकांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सुभाष देशमुख यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिले. 
भाजपच्या आशिष शेलार यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. पणन संचलकांनी सेवाकर वसुलीसाठी अध्यादेश काढला होता. सेवाकर भरावा म्हणून अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे आग्रह धरला होता. मात्र व्यापाऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे सेवाकर भरला गेला किंवा नाही याची चौकशी होईल, असेही देशमुख म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT