महाराष्ट्र

‘गुलाबा’ला बोचला ‘ओखी’चा काटा

रामदास वाडेकर

टाकवे बुद्रुक - पश्‍चिम किनारपट्टीला हादरविणाऱ्या ओखी वादळाचा फटका मावळ तालुक्‍यातील फ्लोरिक्‍लचर पार्कमधील फूल उत्पादनालाही बसला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे गुलाब उत्पादनावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र, ‘व्हॅलेंटाइन डे’चा संभाव्य हंगाम घेण्यासाठी सध्याच्या वातावरणात बदल होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यावरही भर द्यावा लागणार आहे. दररोजच्या औषध फवारणीमुळे गुलाब उत्पादकांच्या खिशाला चाट बसणार आहे. 

देशातील बाजारपेठेत गुलाब पुष्पांची मागणी घडली आहे. या दोन दिवसांत कोणतेच इव्हेंट न झाल्याने मागणी घटली आहे. विशेषतः मुंबई, अहमदाबाद व सुरतच्या बाजारपेठेत घटल्याची माहिती फूल निर्यातदार शेतकऱ्यांनी दिली आहे. या वादळाने रोगांचा प्रादुर्भाव भाव वाढला आहे. केवडा (डाऊनी मिलड्यू), भुरी (पावडरी मिलड्यू) रोगांनी रोपांना घेरले आहे. या रोगांना नियंत्रित करण्यासाठी यापुढे होणाऱ्या वातावरणातील बदलाचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. औषधे आणि खतांचा खर्च वाढेल.

वादळाचा परिणाम
जगभरातून मावळातील गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी तयारी करतात. त्यांची तयारी सुरू झाली असताना वादळामुळे झालेल्या वातावरण बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचा हंगाम पूर्णपणे हातातून जाईल, अशी शक्‍यता वाढली आहे. रोगाच्या प्रमाणात वाढ झाल्याने फुलांना बाजारपेठेत पाठवता येणार नाही की परदेशात निर्यात करता येणार नाही. या परिस्थितीत शेतकरी तग धरीत आहेत. त्यांना आता ‘व्हॅलेंटाइन डे’चा हंगामाची चिंता आहे. तो हंगाम हातात येण्यासाठी रोगाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होण्याची गरज आहे. साधारणपणे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रोपांचे हार्वेस्टिंग व बेंडींग करून ‘व्हॅलेंटाइन डे’ची तयारी करावी लागते. पण अजून पहिल्या रोपांवर रोगांचा प्रादुर्भाव आढळून आल्याने बेडींग करता सध्या तरी करता येणार नाही. त्यामुळे ‘व्हॅलेंटाइन डे’चा तयारी थांबली आहे. 

बाजारपेठेत मागणी घटली
ओखी वादळाने समुद्र किनाऱ्यालगतच्या शहरातील बाजारपेठेत फटका बसला आहे. दिल्ली, लुधियाना, बंगळूर, चंदिगड, पुणे, जयपूर आदी स्थानिक बाजारपेठेलाही फटका बसला आहे. सध्या बाजारपेठेत पाच ते सात रुपये प्रतिनग दराने गुलाब फुलांची विक्री होत आहे. परराज्यात विमान वाहतुकीसह रेल्वे मार्गाने फुले पाठवून त्याची विक्री होत आहे. प्रत्येक दिवशी सरासरी एक लाखापेक्षा अधिक फुलांची विक्री होत असते. दोन दिवसांपासून ओखी वादळामुळे मुंबई, अहमदाबाद, सुरतच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.

देशासह परदेशात फुलांची निर्यात केली जाते. परदेशात एक्‍स्पोर्ट केलेल्या जाणाऱ्या फुलांची गुणवत्ता उत्तम प्रतीची असणे आवश्‍यक आहे. या ढगाळ वातावरणाचा गुलाबाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची दाट शक्‍यता वाढली आहे.

डाउनी, पावडरी चिंतेचा विषय
ढगाळ वातावरणामुळे फुलांच्या रोपांची पानगळती वाढल्याने त्याच्या बंदोबस्तासाठी त्यावर आवश्‍यक खते व औषधे फवारणी करावी लागले. त्यामुळे अधिक खर्च आणि मजुरी द्यावी लागेल. पानगळती वाढली की गुलाब रोपाला स्वतः:च अन्न स्वतः करायला मर्यादा येतात. तेव्हा बाहेरील खाद्यपुरवठा करण्याची गरज भासते. पण पानगळती झालेल्या रोपांची किंमत बाजारात शून्य होऊन जाते, अशी रोपे काढून फेकण्याशिवाय पर्याय राहत नाही. या काळात डाउनी रोगांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना चिंतेचा ठरत आहे.

उपाययोजनांसाठी हतबलता
वातावरणातील बदलाचा फूलशेतीवर परिणाम होऊ लागला आहे. अचानक उद्‌भवलेली ही परिस्थिती कशी हाताळायची हा ही मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे आहे. वातावरण निवळल्याखेरीज काही करता येईल, असे वाटत नाही. सूर्यप्रकाश येण्यासाठी पॉलिथीनचा पेपर स्वच्छ करून पाण्याची आद्रर्ता कमी करता येईल. 

तोट्याची जबाबदारी स्वीकारून फूलशेती करावी लागते. कितीही मोठे नुकसान झाले तरी सरकारने आतापर्यंत नुकसानभरपाई दिली नाही. अचानक आलेल्या मोठ्या नुकसानीला सामोरे जाताना सरकारच्या मदतीची गरज आहे.
- शिवाजी भेगडे,  अध्यक्ष, पुणे जिल्हा फूल उत्पादक संघ

पानगळती हे रोगाचे लक्षण आहे. गुलाबाच्या फुलाप्रमाणे पानांना बाजारपेठेत मोठी मागणी असते. रोपे हिरव्या पानाच्या मदतीने अन्न तयार करीत असतात. पानगळतीमुळे फुलाला हवे ते अन्न मिळत नाही. तसेच सडक्‍या फुलाला कोणी विचारत नाही. डाउनीचा प्रादुर्भाव थेट फुलाला झाला तर ते रोपे उपटून टाकून द्यावे लागते.
- सुधीर वहिले (रोहन ॲग्रो, सांगवी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT