rape case esakal
महाराष्ट्र बातम्या

महिलांवरील लैंगिक अत्याचारात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर; NCRB अहवाल

अत्याचारांच्य घटनांमध्ये राजस्थान प्रथम क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

NCRB Women Violence Report : गेल्या काही वर्षांमध्ये देशातील महिलांवरील अत्याचारात (Violence On Women) लक्षणीय वाढ होतानाचे चित्र असून, महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्राचा चौथ्या क्रमांकावर नंबर लागतो, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (NCRB) अहवालातून ही माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या आकडेवारीत राजस्थानमध्ये सर्वाधिक अत्याचारांच्या घटना घडत असून, अत्याचारांच्य घटनांमध्ये राजस्थान प्रथम क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या या आकडेवारीनंतर देशासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकाद महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

NCRB ने दिलेल्या अहवालात, मुंबई, नागपूर, पुणे आदी शहराचादेखील समावेश असून, देशात महिलांसंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये मुंबई शहराचा पहिल्या पाचमध्ये नंबर लागला आहे. मुंबईत साडेचार हजारांवर गुन्ह्यांची तर नागपूरमध्ये 920 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. देशातील 19 महानगरांत महिलांविरुद्ध घडलेल्या अन्याय-अत्याचारांसंदर्भात दाखल गुन्ह्यांचे सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

देशातील इतर राज्यांतील स्थिती काय?

दरम्यान, महाराष्ट्रापाठोपाठ देशातील इतर राज्यांमध्येदेखील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. त्यात महिलांवरील अत्याचार आणि इतर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद यूपीमध्ये करण्यात आली आहे. 2020 मध्ये या ठिकाणी 49 हजार 385 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर, वेस्ट बंगाल यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून याठिकाणी 36 हजार 439 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये कुटुंबातील सदस्य, पती, जवळचे नातेवाईक, शेजारी, नोकर, मित्र, प्रियकर आणि ओळखीच्या व्यक्तींचा गुन्हेगार म्हणून मोठय़ा प्रमाणात समावेश असल्याचेही समोर आले आहे. सर्वाधिक आरोपी हे ओळखीच्यांमधीलच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Caste Verification: महाराष्ट्रात जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी AI चा वापर होणार! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ब्लॉकचेन वापरण्याचे निर्देश

'खाशाबा'च्या टीझरमध्ये नागराज मंजुळेंना पाहिलंत पण त्यांच्या पत्नीला ओळखलंत का? २ सेकंदासाठी दिसलीय झलक

Pune Ashadhi Wari Sevavari: आषाढी वारीत पुणे महापालिकेची ‘सेवावारी’; स्वच्छता, सांस्कृतिक कार्यक्रम, लाखो वारकऱ्यांसह सामूहिक पसायदानाची तयारी

Khashaba Teaser : माजी खासदार संभाजीराजेंनी कोणत्या छत्रपतींची भूमिका साकारली? नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

Pune Rain: पुणेकरांनो सावधान! पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार; घाट विभागाला रेड अलर्ट, अतिवृष्टीचा इशारा

SCROLL FOR NEXT