महाराष्ट्र

शिवसेनेचा प्लॅन बी अ‍ॅक्टिव्ह; शिंदेंचं घर फोडून सेना वाचवणार?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतराचे राजकीय नाट्याने आता सर्व घडामोडींच्या परिसीमा गाठल्या असून, राज्यात सत्तांतराचे जोरदार वारे वाहू लागले आहे. शिवसेनेतील एक एक आमदार शिंदे यांच्या गटात सामील होत असल्याने शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंच्या चिंतेत मात्र भर पडत आहे. दरम्यान, राज्यात पक्षाबरोबरच सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेकडून प्ला बी वर काम केले जात आहे. यासाठी पक्षाने दोन्ही सभागृहातील खासदारांची टीम तयार केली आहे. हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात असून, खासदार श्रीकांत यांना मैत्रीचे आवाहन करण्याबरोबरच उद्धव यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंध ठेवण्याबाबत उद्धव समर्थक त्यांच्याशी चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे खासदारांच्या गटाने श्रीकांत यांच्यासोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्याचा दावा केला जात आहे. (Eknath Shinde Latest News In Marathi)

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे जवळपास सहा दिवस आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. त्याचवेळी त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात वडिलांच्या समर्थनार्थ मोर्चेबांधणी केली आहे. नुकतेच खासदार श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी शिवसेना कार्यालय गाठून निदर्शने केली होती. अशा स्थितीत आता पक्षाचे इतर खासदार श्रीकांतच्या माध्यमातून एकनाथांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार आहेत. पक्षाचे राज्यभरात लोकसभेत 19 आणि राज्यसभेत तीन खासदार आहेत. अशा स्थितीत पाच खासदारांची टीम श्रीकांत यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात असून, श्रीकांत शिंदे यांच्यामाध्यमातून एकनाथ यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू शिवसेनेकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Maharashtra Politics )

शिंदे आणि शिवसेना समर्थकांनी एकमेकांशी भांडू नये

शिवसेनेच्या खासदार गटाशी संबंधित असलेल्या सूत्रांनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीनंतर सर्व खासदार सक्रिय झाले आहेत. मुंबई, ठाणे वगळता राज्यात कुठेही शिंदे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये संघर्ष होता कामा नये याची काळजी घेतली जात आहे. कारण दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांसमोर आले तर, त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसणार आहे. त्यामुळेच हा वादाची परिस्थिती रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केल जात आहे. दुसरीकडे, सर्व खासदारही उद्धव ठाकरेंना बंडखोर नेत्यांबाबत कठोरता दाखवू नका आणि सामंजस्य करण्याचा आग्रह करत असल्याची विनंती करत आहेत.

श्रीकांत शिंदे संजय राऊतांवर भडकले

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राऊतांनी बंडखोरांबद्दल केलेल्या विधानावरून जोरदार हल्लाबोल केला होता. राऊतांनी बंडखोर आमदारांना आत्मा नसलेले शरीर अशी उपमा दिली होती. या त्यांच्या विधानावर श्रीकांत शिंदे यांनी राऊतांना चांगलेच खडेबोल सुनावत राऊतांनी संभाळून भाष्य करावे ही महाराष्ट्राची संस्कृति नसल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : ''...तर वेगळा विचार करावा लागेल'', अजित पवार गटाकडून थेट भाजपला इशारा

Explained: DRS साठी खेळाडूंना सपोर्ट स्टाफची मदत घेता येते का? वाचा, काय सांगतो नियम

Viral Video: बिहारमध्ये 12 कोटी रुपयांचा पूल उद्घाटनापूर्वीच कोसळला, पाहा व्हिडिओ

Virat Kohli : ब्रँड व्हॅल्यूत विराट कोहलीच 'किंग', रणवीर काय शाहरूख खानलाही टाकलं मागं

Pandharpur Ekadashi: निर्जला एकादशीनिमित्त पंढरीत लाखो भाविकांची गर्दी

SCROLL FOR NEXT