Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: प्रतिक्षेत असणाऱ्या बच्चू कडूंना मिळणार दिव्यांग मंत्रीपद? चर्चेला उधाण

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?

धनश्री ओतारी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहेत. अशातच मोठी अपडेट समोर आली आहे. प्रतिक्षेत असणाऱ्या बच्चू कडूंना दिव्यांग मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. तसेच, मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही ठरली असल्याचे सांगण्यात येत आहे. (maharashtra politics cabinet expansion may 23 or 24 Bacchu Kadu Sanjay Shirsat Bharatshet Gogawale )

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रखडलेल्या मंत्रि मंडळाचा विस्तार हा २३ किंवा २४ मे ला घेण्याची चर्चा दबक्या आवाजाने आमदारांमध्ये सुरू आहे.(Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगवले( जलसंधारण मंत्री), संजय शिरसाठ (परिवहन किंवा समाज कल्याण) बच्चू कडू (दिव्यांग मंत्री)प्रताप सरनाईक , सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर, चिमन आबा पाटील या आमदारांची वर्णी लागण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याचे बोलले जात आहे.

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांच्या अपेक्षा भंग झाल्या. काहींनी जाहीर नाराजीही व्यक्त केली. यात संजय शिरसाट तसेच बच्चू कडू यांचाही समावेश आहे. आता २८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे आता कोणा कोणाची वर्णी लागणार हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT