Manoj Tiwari Manoj Tiwari
महाराष्ट्र बातम्या

काँग्रेसला सल्ला देत तिवारी म्हणाले; आम्हाला पण मजबूत विरोधी पक्षाची गरज

अभिजित घोरमारे

भंडारा : काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांचे ऐकत नाही. देशाचे ऐकत नाही. यामुळेच ते संकटात आहे. आम्ही त्यांच्याविषयी काय बोलणार आहे. काँग्रेसने लोकतंत्राचा अर्थ समजला पाहिजे. कुटुंबाला सोडून अन्य लोकांना संधी दिली पाहिजे, असे खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) म्हणाले.

भंडारा येथे रविवारी (ता. १३) खासदार महोस्तवासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस पक्ष आपल्या कर्माने संपण्याचा मार्गावर आहे. काँग्रेसने (Congress) कुटुंबाला सोडून इतर कार्यकर्त्यांना काँग्रेसची कमांड द्यायला पाहिजे. कितीतरी चांगला उपाय मी देत आहे. कारण, आम्हाला पण मजबूत विरोधी पक्षाची गजर आहे, अशी टीकाही मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी केली.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे (Congress) मोठे नुकसान होत आहे. काँग्रेसने देशाची आवाज ऐकली पाहिजे. काँग्रेसने लोकतंत्राचा अर्थ समजला पाहिजे, असेही मनोज तिवारी म्हणाले. पाच राज्यांतो मिळालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशात मनोज तिवारी यांनी काँग्रेसला सल्ला देण्याचे काम केले.

पंजाबमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता गेल्यानंतर पंजाबच्या जनतेचे खूप चांगला निर्णय घेतला आहे. पंजाबमधील जनतेने पंजाबमध्ये नवा पर्याय निवडला म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो, असे वक्तव्य नवज्योतसिंग सिद्धू यांनी केले होते. पक्षातूनच काँग्रेसला विरोध होत असल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी दिलेल्या सल्ल्यावर काँग्रेसने (Congress) नक्की विचार करायला हवा.

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची कारणे आणि भविष्यातील कृतीबाबत रविवारी काँग्रेस कार्यकारिणी या काँग्रेसची सर्वोच्च धोरण ठरविणारी संस्थेची चर्चा झाली, हे विशेष...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियाकडून तेल खरेदी, तरीही टॅरिफ नाही! ट्रम्प यांचा भारताला मोठा दिलासा

Mira-Bhayandar: मिरा-भाईंदर महापालिकेत भाजप नगरसेवकांचा राडा, पत्रकारांना बेदम मारहाण; Video Viral

Who Is Deepa Bhati : तीन मुलांची आई, वयाच्या ४० व्या वर्षी यूपी पीसीएसमध्ये यश; लग्नानंतर १८ वर्षांनी दीपा भाटी बनल्या अधिकारी

Hasan Mushrif On Gokul Election : 'गोकुळ'च्या राजकारणात नवा ट्विस्ट! मुख्यमंत्र्यांच्या हातात असणार अध्यक्षपदाची सूत्रे, मंत्री हसन मुश्रीफांनी काय केलं जाहीर?

Equal Pay Demand: समान काम, समान वेतन द्या...न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

SCROLL FOR NEXT