...तर आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार; सोनिया गांधींनी केलं स्पष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Government withdraws SPG cover for Gandhi family

...तर आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार; सोनिया गांधींनी केलं स्पष्ट

सीडब्ल्यूसीच्या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (sonia gandhi) यांनी पक्षाला वाटले तर आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार आहोत. सोनिया गांधी स्वतःशिवाय राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा उल्लेख करीत होत्या. मात्र, सोनिया गांधी यांचा राजीनामा देण्याची ऑफर काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची कारणे आणि भविष्यातील कृतीबाबत रविवारी काँग्रेस (Congress) कार्यकारिणी या काँग्रेसची सर्वोच्च धोरण ठरविणारी संस्थेची चर्चा झाली. महत्त्वपूर्ण बैठकीच्या एक दिवसआधी गांधी कुटुंबीय पक्षाच्या पदांचा राजीनामा देऊ शकतात, अशी बातमी पसरली होती.

मात्र, काँग्रेसने या वृत्ताचे खंडन केले होते. मात्र, आता सूत्रांच्या हवाल्याने पक्षाच्या हंगामी अध्यक्षांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: Farmers Protest : केंद्रीय कृषी मंत्र्यांचं पत्र PM मोदींनी केलं ट्विट; म्हणाले...

सोनिया गांधी (sonia gandhi) गेल्या काही काळापासून सक्रियपणे प्रचार करीत नाहीत, प्रियांका गांधी वाड्रा यांच्याशिवाय राहुल गांधी हे काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. तसेच पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भाऊ-बहीण जोडीचा मोठा वाटा असतो. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) दारुण पराभवानंतर पक्षाच्या G-२३ गटातील अनेक नेत्यांची शुक्रवारी बैठक झाली. ज्यामध्ये भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला कपिल सिब्बल, आनंद शर्मा आणि मनीष तिवारी उपस्थित होते.

राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्याची मागणी

बैठकीपूर्वी गेहलोत, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि इतर अनेक नेत्यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पुन्हा पक्षाध्यक्ष बनवण्याची मागणी केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गेहलोत म्हणाले की, आजच्या काळात राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत, जे पूर्ण ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करीत आहेत.

Web Title: Sonia Gandhi Rahul Gandhi Priyanka Gandhi Congress Meeting Of Congress Executive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..