Manrega-Work
Manrega-Work 
महाराष्ट्र

‘मनरेगा’ची ४४ हजार कामे सुरू

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात रोजगार हमी योजना विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (मनरेगा) राज्यात ४४ हजार ५५५ कामे सुरू असून, त्यावर २ लाख ९६ हजार मजुरांची उपस्थिती आहे. जानेवारीअखेर मजुरांची संख्या ४४ हजार ६१९ इतकी वाढली आहे. याशिवाय मजुरांना वेळेत मजुरी देण्याचे प्रमाणही वाढले असून, जानेवारीअखेर हे प्रमाण ९४ टक्के इतके आहे, अशी माहिती रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

रावल म्हणाले, की दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर मागेल त्याला तातडीने काम उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जात आहे. केंद्र शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी मजुरीचे ५० दिवस वाढवून दिले आहेत.

मजुरांचा तपशील
    गोंदिया - ६ हजार ७७७
    गडचिरोली - ५ हजार ८२३
    उस्मानाबाद - ४ हजार २२६
    पालघर - २ हजार ९३७
    परभणी - २ हजार ९३५
    लातूर - २ हजार ७७१
    चंद्रपूर -२ हजार ६०५
    भंडारा - २ हजार ५२४
    जळगाव - २ हजार ६६
    बीड - १ हजार ४९८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT