Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्वाची माहिती

आज मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकील जवळजवळ सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीला ३२ जण उपस्थित होते, सर्व गोष्टींवर विस्तृत चर्चा झाली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यावर सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत झालं आहे, तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सरकारची देखील भूमिका आहे.

राज्यातील सर्व पक्ष एकत्रित काम करण्यासाठी तयार आहे, इतर समाजावर अन्याय न होता मराठ्यांना आरक्षण मिळावं असं आमचं याबाबत सर्वांचं एकमत झालं. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोग युध्द पातळीवर काम करत आहे, मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, मराठा समाजाने संयम राखावा, मनोज जरांगे यांनी सरकारला सहकार्य करावे ही सर्वपक्षीय नेत्यांची भावना असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आम्ही टिकणारं आरक्षण देणार असून सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आम्ही आरक्षणांच्या बाजूने आहोत. सुप्रीम कोर्टात क्युरीटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. ३ निवृत्त न्यायाधिशांची समिती गठित करण्यात आली आहे, सरकारला थोडा वेळ द्यावा असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

"मराठा समाजाने थोडा संयम बाळगावा. सरकारला थोडा वेळ द्यावा, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, आणि सहकार्य करावं. आमच्यावर विश्वास ठेवा. आम्हाला सहकार्य करा. सर्वसामान्य माणसाला अविश्वास वाटता कामा नये, सकल मराठा समाजाने सहकार्य करावं" असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहावी यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आजच्या बैठकीत सर्वपक्षीय ठराव करण्यात आला आहे, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांनी कामरूप जिल्ह्यातील खेत्रीजवळील राष्ट्रीय महामार्ग-२७ वरील अपघातस्थळाला भेट दिली

SCROLL FOR NEXT