Maratha Reservation: मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली तातडीची सर्वपक्षीय बैठक

शरद पवार यांच्यापासून आंबेडकर यांना बैठकीचं निमंत्रण
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला आहे. राजकीय वातावरण देखील तापलं आहे, अशातच आरक्षणावर तोडगा निघत नसताना दुसरीकडे मात्र, मनोज जरांगे पाटील टप्प्या टप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवत आहेत. मनोज जरांगे आता आंदोलन आणखी तीव्र करणार आहेत. राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. आज होणाऱ्या या बैठकीत आरक्षणावर तोडगा काढण्यावर चर्चा होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सकाळी 10.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीत मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतात याकडे राज्याच लक्ष लागलं आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून 15 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू

बैठकीला कोण कोण राहणार उपस्थित

या बैठकीला 27 नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप खासदार उदयनराजे भोसले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे, भाजपचे प्रदेशााध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे, शेकापचे जयंत पाटील, बविआचे हितेंद्र ठाकूर, जनता दल (यू)चे कपिल पाटील, जनसुराज्यचे विनय कोरे, रासपचे महादेव जानकर, प्रहारचे बच्चू कडू, मनसेचे राजू पाटील, अमरावतीचे आमदार रवी राणा, माकपचे विनोद निकोले, वंचितचे प्रकाश आंबेडकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, आरपीआय गवई गटाचे राजेंद्र गवई, आरपीआय आठवले गटाचे गौतम सोनावणे आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या सुलेखाताई कुंभारे यांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आलं आहे.

Maratha Reservation
LPG Price Hike: दिवाळी सणापूर्वी मोठा धक्का... LPG सिलिंडर महागला, जाणून घ्या किती रुपयांनी वाढली किंमत?

दरम्यान या सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आलेले नाही. याबाबतचे ट्विट ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation : आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न; कठोर कारवाईच्या सूचना...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com