residentional photo
residentional photo 
महाराष्ट्र

कार्यकाळ संपत आल्याने सरकारला ओबीसींचा कळवळा: छगन भुजबळ 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाही, आणि आता सरकारची टर्म संपत आल्याने सरकारला ओबीसींचा कळवळा आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी, भटक्‍या विमुक्तांच्या विकासासाठी जाहीर केलेल्या निधींबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सरकारवर टीका केली.विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ नेते बापू भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नानासाहेब महाले उपस्थित होते. 

श्री भुजबळ म्हणाले की निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून ओबीसींना खुश करण्यासाठी गाजर दिले जात आहे. मराठा आणि ओबीसीत भांडण लावण्याचे काम सुरु आहे. निवडणुकीच्या दृष्टीने भाजप सरकारने राज्यात ओबीसी महामंडळाची स्थापना केली, मात्र ओबीसी महामंडळात एखादाच ओबीसी घेतला जातो. ओबीसी आरक्षण बंद 
करण्यासाठी न्यायालयात केस दाखल करण्यात येत आहे. त्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. खुल्या प्रवर्गातून एमपीएससी परीक्षेत पास झालेल्या ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अजूनही नोकरीवर घेतले जात नाही. त्यामुळे सरकारच्या घोषणाबाजीला राज्यातील जनता याला बळी पडणार नसून सरकारने अगोदर विद्यार्थ्यांच्या राखडकेल्या शिष्यवृत्तीचे पैसे अगोदर दयावे आणि नंतर इतर योजना आणाव्या.अशी मागणी केली. 

गुजरातला पाणी देण्याचा घाट 
आघाडी सरकारच्या अनेक योजना बंद आहेत. नार पारचे पाणी गुजरातला देण्याचा करार अंतिम टप्यात आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक प्रकल्प दुसरीकडे पाठविण्याचा घाट घातला जातो आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. परिवहन मंत्री शिवसेनेचे असतांना बीएसटीचा प्रश्न प्रलंबित आहे. याला शिवसेना जबाबदार असून खाजगीकरण करण्याचा डाव आहे काय ? असा प्रश्‍न उपस्थित करून श्री भुजबळ यांनी, मुंबईच्या नागरिकांनी एकत्र येऊन बेस्ट वाचविण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्याची गरज आहे. प्रश्न सुटला नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून याबाबत तीव्र स्वरूपात आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. 

बेस्टला अनुदान गरजेचे 
शासनाने बेस्टला अनुदान (सबसिडी) द्यायला पाहिजे संपाला शिवसेना जबाबदार आहे. गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणेच बेस्ट कामगार संप सुरु आहे. बेस्ट बंद करून खाजगीकरण करण्याचा बेस्ट डेपोच्या जागी मोठी मॉल उभे करण्याचा डाव असल्याचा संशय आहे. मुंबईकरांनी बेस्टच्या संपाबबत रस्त्यावर उतरावे आंदोलन करावे 
राष्ट्रवादी कॉंग्रेस कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करेल योग्य वेळी पुढे येईल. 

आंबेडकरांची प्रतिक्षा 
भाजप विरोधात सगळ्या समविचारी पक्षांची आघाडी व्हावी. असा प्रयत्न आहे. त्यासाठी ऍड प्रकाश आंबेडकर त्यांनी आघाडीत सहभागी व्हावे म्हणून त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यांच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे. 


मुंडे यांची टीका 
धनंजय मुंडे म्हणाले की, महागाई, नोट बंदी, आणि जीएसटी मधील जाचक अटी लादल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जनता तीव्र नाराज आहे. यामध्ये संपूर्ण देशातील ग्रामीण विभागाबरोबरच शहरी भागातील जनता देखील नाराज आहे. सरकारने सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा जास्त उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जास्त उंचीचा होऊ नये यासाठी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा सरकारचा डाव असून सरकार कडून महापुरुषांचा अवमान करण्याचा सरकार कडून प्रयत्न सुरू असल्याची टीका करतांना, सरकार नियोजन शून्य काम करत असून राज्य सरकारच्या कामकाजात पोरखेळ सुरू असल्याचे नाणार प्रकल्प हलविण्याचा मुद्यावर ते त्यांनी टिका केली. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT