Marathi News Nagpur news Ajit pawar criticized Maharashtra government
Marathi News Nagpur news Ajit pawar criticized Maharashtra government  
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडून पळवाट - अजित पवार

सकाळवृत्तसेवा

नागपूर - सध्या विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन कामकाज सुरु आहे. सभागृहाचे कामकाज सुरू होताच कर्जमाफी आणि पंचनामे तातडीने करा या मागणीसाठी विरोधकांनी गदारोळ केला. वेलमध्ये येऊन घोषणाबाजीही केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चौथ्यांदा तहकूब करण्यात आले आहे. तीस मिनीटांसाठी पुन्हा कामकाज स्थगित करण्यात आले.   

बोंड अळीच्या लक्षवेधीवर चर्चा करण्याची विरोधकांनी मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पळवाट काढत असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांना काय समस्या आहेत याची माहिती सरकारला कशी मिळत नाही असा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यावर आजच चर्चा करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तर, 'सरकार गंभीर नसून वेळकाढूपण करत आहे. हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर लिहून देतो असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते, मग आता मुख्यमंत्री का चर्चा करत नाहीये? कामकाजात जो विषय लक्षवेधी आहे, तो पुढे ढकलण्याचे कारण काय?' असे सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केले. 'सरकार या सभागृहाला गांभीर्याने घेत नाही. तीन वर्षांपासून हे चित्र सभागृहात दिसते आहे. ही लक्षवेधी पुढे का ढकलली याचे कारण सरकारने द्यावे. सरकारने दिलगिरी व्यक्त केली पाहिजे,' अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांनी सरकारला केली.

विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देत 'स्वतःचा प्रेस्टिज इशू करू नये,' असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. तसेच सरकार उत्तर देईल आणि सरकार चर्चा करायला तयार आहे असेही त्यांनी सभागृहात सांगितले. 

बोंड अळीच्या विषयावर २९३ अन्वये चर्चाही सभागृहात पार पडली. लक्षवेधीतून भाजप आमदार आशिष देशमुख यांचे नाव वगळण्यात आले आहे. या विषयावर लक्षवेधी पुढे ढकलल्याने आशिष देशमुख विरोधकांसोबत या मुद्द्यावर वेलमध्ये उतरले होते. मात्र जाणीवपूर्वक नाव कापल्याचा नाराज देशमुख यांनी आरोप केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT