Ajit Pawar
Ajit Pawar esakal
महाराष्ट्र

Ajit Pawar : ''तुम्ही माझ्याकडे सावत्र भाऊ म्हणून बघू नका'', अजित पवार-यशोमती ठाकूर यांच्यात जुंपली

संतोष कानडे

मुंबईः विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा सातवा दिवस आहे. मागच्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर आमदारांच्या निधी वाटपामध्ये भेदभाव केल्यााचा आरोप होत आहे. त्याला आज अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिलं.

सभागृहामध्ये आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी निधीवरुन मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनीही अजित पवारांवर आक्षेप घेतला. त्यावर बोलतांना पवारांनी निधीमध्ये कसलाही दुजाभाव केला नसल्याचं म्हटलं आहे. जे २०१९, २० आणि २१ मध्ये होतं, तेच सुरु ठेवल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

यशोमती ठाकूर यांना उद्देशून बोलतांना अजित पवार म्हणाले की, मी भावाच्या नात्याने ओवाळणी देतो परंतु तुम्ही चष्मा बदला, सावत्र भाऊ म्हणून बघू नका. ज्यावेळी कृषी महाविद्यालयाला द्यायचे होते त्यावेळी बाळासाहेब थोरात यांचेही महाविद्यालय होते. आम्ही भेदभाव केलेला नाही.

पवार म्हणाले की, आमचे सरकार शहरी-ग्रामीण असा भेदभाव करणार नाही. सर्वांना समान न्याय दिला जाईल. अंगणवाडी सेविकाच्या वाढीव मानधनाची रक्कम या पुरवणी मागण्यांमध्ये दाखविण्यात आलेल्या आहेत. तसेच, कांदा उत्पादकांसाठी साडेतीनशे रुपये क्विंटलप्रमाणे ५५० कोटी रुपये पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केले आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांनी विकास कामांचा मुद्दा उपस्थित करीत, विकासकामावरील स्थगिती उठवा, अशी मागणी केली. त्यावर अजित पवारांनी स्थगिती दाखवा लगेच उठवतो, अशी भूमिका घेतली. विरोधकांच्या सर्व मुद्द्यांना अजित पवारांनी यावेळी उत्तर दिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT