narayan rane, sanjay raut sakal
महाराष्ट्र बातम्या

शिवराळ भाषा म्हणजे मर्दानगी नव्हे; नारायण राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी काल अतिशय शिवराळ भाषेत भाष्य केले होते.

निनाद कुलकर्णी

मुंबई : शिवसेना भवनामध्ये (Shivsena Bhavan) काल संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राऊत यांच्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी काल अतिशय शिवराळ भाषेत भाष्य केले होते. त्यांच्या या शब्दांबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी तसेच सामन्य नागरिकांनी देखील टीका केली होती. दरम्यान, राऊत यांच्या या भाषेचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील जोरदार समाचार घेतला आहे. राणे म्हणाले की, शिरवाळ भाषा वापरणे म्हणजे मर्दानगी नसल्याची खोचक टीका त्यांनी राऊतांवर केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील अनेक मुद्यांवर भाष्य केले. (Narayan Rane Slams Sanjay Raut)

राणे यांनी राऊत यांच्या परिषदेचा उपरोधिकपणे उल्लेख करत म्हटलंय की, काल आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेला तुम्ही उपस्थित होतात. त्यामुळे त्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणा किंवा मित्र संजय राऊत यांची जी केविलवाणी परिस्थिती झाली होती आणि जो घाम फुटला होता, तो कशामुळे फुटला होता. विरोधकांनी फोडला होता की चुकीच्या कामांना घाबरुन घाम फुटला होता, ते सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद मी घेत आहे. हा शिवसेना वाढवण्यासाठी नाहीये. याचं लक्ष उद्धव ठाकरे जिथे बसलेत, त्या खुर्चीवर आहे, असा खोचक टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

Sugar Export Ban: निर्यात बंदीमुळे देशातील साखर उद्योगासमोर संकट: हर्षवर्धन पाटील यांची माहिती; आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होणार!

Premium|AI and Sustainability History : ‘एआय’ आणि शाश्वत विकास; पृथ्वी वाचवणारे अस्त्र की मानवी रोजगारावर कुऱ्हाड?

SCROLL FOR NEXT