संजय राऊतांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीकडं - नारायण राणे

Narayan Rane
Narayan RaneNarayan Rane
Summary

जसं काय शिवसेनाप्रमुख हाच झालाय असा आवेश होता. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी एका वृत्तपत्राचा संपादक काय बोलतो?

मुंबई: मंगळवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावर आता उत्तर देणारी पत्रकार परिषद नारायण राणे यांनी मुंबईमध्ये मुंबईमध्ये घेतली आहे. (Narayan Rane Press Conference) यावेळी बोलताना राणे यांनी राऊत यांच्या परिषदेचा उपरोधिकपणे उल्लेख करत म्हटलंय की, काल आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेला तुम्ही उपस्थित होतात. त्यामुळे त्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणा किंवा मित्र संजय राऊत यांची जी केविलवाणी परिस्थिती झाली होती आणि जो घाम फुटला होता, तो कशामुळे फुटला होता. विरोधकांनी फोडला होता की चुकीच्या कामांना घाबरुन घाम फुटला होता, ते सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद मी घेत आहे. हा शिवसेना वाढवण्यासाठी नाहीये. याचं लक्ष उद्धव ठाकरे जिथे बसलेत, त्या खुर्चीवर आहे, असा खोचक टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे. (BJP Vs Shivsena)

Narayan Rane
राहुल गांधी मला दहशतवादी म्हणतात, 20 फेब्रुवारीला कळेल: केजरीवाल

पुढे त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेत कधी आणि कसे आले, याबाबत खुलासा करत नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद कशाला घेतली होती? जाहीरात काय तर राज्यभरातले शिवसैनिक येणार आणि साधे विभागप्रमुखही आले नाहीत, नेते मंत्रीही नाहीत. पक्षाचे प्रमुखही नाहीत. नाशिकचे काही लोक मात्र होते मोजके, कारण संपर्क प्रमुख असल्यामुळे आणलेले.

शिवसेनेने (Shiv Sena) पत्रकार परिषद घेतलेली की स्वत: अडचणीत आहे म्हणून घेतली? एवढे दिवस सेना भवन आठवलं नाही. जसं काय शिवसेनाप्रमुख हाच झालाय असा आवेश होता. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी एका वृत्तपत्राचा संपादक काय बोलतो? आक्षेपार्ह हा शब्द उच्चारतो.

Narayan Rane
कोल्हेंवर आढळरावांचा पलटवार; "नाटकातली घोडी अनं नौटंकी थाट!"

पुढे ते म्हणाले की, शिवसेनेत हा माणूस आला कधी? 10 मे 1992 ला आला. सामनामध्ये संपादक म्हणून आला. त्याआधी लोकप्रभा मध्ये होता. त्याआधी मार्मिकमधून हकालपट्टी झाली. लोकप्रभामध्ये असताना जे काही पराक्रम केले. त्यांनी त्यावेळी बाळासाहेबांविरुद्ध अनेक लेख लिहले. त्यात त्यांनी बाळासाहेबांबद्दल आक्षेपार्ह लिहल्याने बाळासाहेबांनीही त्यांच्याबद्दल लिहलं आहे. राऊत कशी आग लावतात, याबद्दल लिहलं होतं. (Narayan Rane on Shiv sena NCPalliance)

हा शिवसेना वाढवण्यासाठी नाहीये. याचं लक्ष उद्धव ठाकरे जिथे बसलेत, त्या खुर्चीवर आहे, असा खोचक टोलाही नारायण राणे यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com